टिव्हीवरील 'इंद्रायणी' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आणि घरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील परंपरांना आणि संस्कृतीला मोठ्या अदबीत जपणारी ही मालिका सध्या दिवाळीच्या उत्साहाने भारावली आहे. दिवाळी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असल्याने या सणाचे विशेष महत्त्व मालिकेतही दाखवले जात आहे.
दिवाळी म्हटलं की, फराळ, फटाके, नवे कपडे, आणि विशेषतः किल्ले बनवण्याची परंपरा हे सगळेच जणू आनंदाच्या सागरात न्हाल्याचे चित्र निर्माण करतात. 'इंद्रायणी' मालिकेतही इंदू आणि तिच्या फंट्या गँगने दिवाळी निमित्त किल्ला बनवताना दिसत आहेत. ज्यातून त्यांच्या आनंदाचा आणि संस्कृतीशी असलेल्या नात्याचा भावनिक प्रवास दाखवला जात आहे. किल्ला बनवण्याच्या या परंपरेने मराठी माणसाचे मराठी मातीशी असलेले नाते अधिक दृढ केले आहे आणि मालिकेने ही भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे.
किल्ला बनवल्याबद्दल इंदू म्हणाली,"इंद्रायणी' मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच किल्ला बनवला आहे. किल्ला बनवल्यानंतर एक वेगळंच बळ आलंय. खूप मजा करत सेटवरील आम्ही सर्वांनी हा किल्ला बनवला आहे. किल्ला बनवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर एक वेगळाच जोश आला आहे. किल्ल्यावर मावळे बसवणं, झेंडे लावणं, सैनिक लावणं, छोटी-छोटी झाडं लावणं, किल्ला रंगवणं, अशा सर्व गोष्टी आम्ही फंट्या गँगने मिळून केल्या. आता दरवर्षी दिवाळीत मी एक किल्ला बनवण्याचं ठरवलं आहे".
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.