मुंबई: मनोरंजन क्षेत्रातील संबंधित विभागांना, व्यक्तींना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित केले जाते. ऑस्कर पुरस्कार हा चित्रपटसृष्टीत मानाचा पुरस्कार समजला जातो. यावेळी गुजराती भाषेतील 'छेलो शो' या चित्रपटाला भारताकडून नामांकन मिळाले आहे. मात्र, यावर्षी 'काश्मीर फाइल्स' आणि 'आरआरआर' सारख्या मोठ्या यशस्वी चित्रपटांबद्दल खूप अपेक्षा होत्या. पण त्या कोणात्याच अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. गेल्या वर्षभरात हिंदीसह इतर भारतीय भाषांमधील चित्रपटांना त्यांच्या सर्वोत्तम कथेवर ऑस्करसाठी भारतातर्फे नामांकनं मिळाली आहेत. (Marathi Entertainment News) (Bollywood New Movie Release)
गेल्या दहा वर्षांतील हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 2017 मध्ये राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या 'न्यूटन' चित्रपटाला परदेशी भाषेत सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्करमध्ये अधिकृत प्रवेश मिळाला होता. त्याचवेळी 2019 मध्ये, रणवीर सिंग (Bollywood Actor) मुख्य भूमिकेत असलेल्या 'गली बॉय' चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. रणवीरचा हा चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपटाच्या श्रेणीत पाठवण्यात आला होता. (Bollywood Films)
सोबतच 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट तमिळ भाषेतील चित्रपट 'पेबल्स' ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. 2020 मध्ये मल्याळम भाषेतील चित्रपट जल्लीकट्टू, 2018 मध्ये आसामी भाषेतील चित्रपट व्हिलेज रॉकस्टार, 2016 मध्ये विसरणाई, 2015 मध्ये हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'कोर्ट'ला भारताकडून ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. 2014 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीचा चित्रपट लायर्स डाइस आणि 2013 मध्ये द गुड रोड हा चित्रपट ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आले होते.
Edit By: Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.