Miss universe 2021 SaamTV
मनोरंजन बातम्या

Miss universe 2021 : भारताची हरनाझ संधू बनली 2021 ची विश्वसुंदरी

याआधी देखील 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब जिंकला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'मिस युनिव्हर्स 2021' या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चंदीगड गर्ल हरनाज संधू हिला अखेर 2021चा मिस युनिव्हर्स (Miss universe 2021) किताब मिळाला आहे . इस्रायलमध्ये 12 डिसेंबर रोजी 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेमध्ये तीन देशातील महिलांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले, त्यात भारताच्या हरनाज संधूचाही (Harnaz Sandhu) समावेश होता. या तीन देशांपैकी दक्षिण आफ्रिका आणि पॅराग्वे या दोन्ही देशातील मॉडेल्सना मागे टाकून भारताच्या हरनाझ संधूने विश्वसुंदरी मुकुट पटकावला आहे.

याआधी देखील 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' (Miss Diva Miss Universe India 2021) किताब जिंकला होता. त्यानंतर तिने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70 वं वर्ष आहे. दरम्यान या सोहळ्याचा भाग होण्यासाठी दिया मिर्झाही भारतातून आली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT