लातुर : सध्या जगभर कोरोना (Corona) महामारीच संकट आहे ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा कहर डोक्यावर टांगत्या तलवारी सारखा उभा आहे. महसूल आरोग्य विभाग लसीकरणाबाबत (Vaccination) जनजागृती करत आहे मात्र गावखेड्यात लसीकरण कमी होताना दिसतं आहे. या जनजागृती मोहीमेत कीर्तनकाराना सामावून घेतल्यास ग्रामीण भागात लसीकरणाचा टक्का नक्कीच वाढायला मदत होईल यासाठी शासनाने विचार करायला हवा अस मत कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी केले आहे.
हे देखील पहा -
शिवलीला पाटील (Shivlila Patil) लातुर जिल्ह्यातील औसा इथं श्री मुक्तेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित कीर्तन सोहळ्या निमित्त आल्या होत्या ओमिक्रॉन संकट पाहता राज्य शासन गंभीर बनले आहे लसीकरण वाढावे यासाठी शासन प्रशासन स्तरावर मोठे प्रयत्न केले जात आहेत मात्र गावखेड्यामंध्ये आजही लस घेण्यासाठीचा उत्साह दिसून येत नाहीये. या पार्श्वभूमीवरच 'बिग बॉसचा BiggBoss विजेता स्पर्धकाने लसीकरणा बद्दल आवाहन केले तरी याचा फारसा परिणाम होत नाही पण गावखेड्यातील लोकांना कीर्तनकार याचं ऐकलं जात शासनाच्या या मोहिमेत किर्तनाकारांना सामावून घेतले तर नक्कीच लसीकरणाचा टक्का वाढेल.' असं मत शिवलीला पाटील यांनी व्यक्त केलं.
गावखेड्यात बिग बॉसचा विजेता नाही तर कीर्तनकाराचं चालत लोक ऐकतात याचा शासनाने विचार करावा आणि या जनजागृती मोहिमेत सामावून घ्याव असं आवाहन कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी राज्य सरकारला केले आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या स्पर्धेत शिवलीला या सहभागी झाल्या होत्या त्यांच्या या सहभागामुळे त्यांना वादाला देखील सामोरं जावं लागल होतं दरम्यान आजारी असल्याचं सांगत त्या बिग बॉसमधून बाहेर पडल्या होत्या.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.