India's Got Talent 10 Saam Tv
मनोरंजन बातम्या

India's Got Talent 10: 'इंडियाज गॉट टॅलेंट 10'च्या ट्रॉफीवर छत्तीसगडच्या 'या' ग्रुपने कोरलं नाव, मिळालं इतक्या लाखांचं बक्षीस

India's Got Talent: 'इंडियाज गॉट टॅलेंट' हा लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

India's Got Talent 10 Winner:

टीव्हीवरील 'इंडियाज गॉट टॅलेंट' हा लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धक आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी येतात. यावर्षीचा या शोचा 10 वा सीझन देखील खूपच खास होता. या शोमध्ये देशभरातील अनेक ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते.

नुकताच या रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले पार पडला. हा रिअॅलिटी शो संपूर्ण जगभरात पाहिला जातो. 'इंडियाज गॉट टॅलेंट 10' ची ट्रॉफी छत्तीसगडच्या ग्रुपने आपल्या नावावर केली आहे.

'इंडियाज गॉट टॅलेंट 10' ची ट्रॉफी छत्तीसगडच्या अबुझमद मल्लखांब अकादमीच्या स्पर्धकांनी जिंकली आहे. त्यांना या ट्रॉफिसोबत 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. अबुझमद मल्लखांब अकादमी स्पर्धकांवर सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही संपूर्ण टीम या शोमध्ये मल्लखांब या साहसी खेळाचे प्रयोग करून दाखवायचे. या शोमध्ये राग प्यूजन हा ग्रुप उपविजेता ठरला आहे. त्यांना 5 लाखांचे बक्षीस देण्यात आले.

इंडियाज गॉट टॅलेंट हा शो फार पूर्वीपासून सुरू आहे. या शोचे अनेक भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दरवर्षी अनेक नवनवीन स्पर्धक या शोमध्ये सहभागी होत त्यांचे जबरदस्त टॅलेंट दाखवत असतात. या शोमध्ये नवीन कलागुंणाना वाव दिला जातो. या शोमध्ये अनेक जीवावर बेतणारे स्टंट केले जातात. जे प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात.

इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये देशातील वेगवेगळ्या भागातून कलाकार आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी येतात. या शोमध्य जजच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सिंगर बादशाह आणि ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर दिसल्या. आता या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला खरा पण या शोच्या माध्यमातून भारतातील अनेक मुलांमधील टॅलेंट जगासमोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पात्र ITI विद्यार्थ्यांना SSC आणि HSSC समकक्ष मान्यता; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

MSRTC अखेर दरवाढ केलीच! मध्यरात्रीपासून नवे दर लागू; किती असेल मुंबई-पुण्यासाठी तिकीट

खोत डोंगरी पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला; न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवला, ऑफिस कंटेनर हटवला

सलमान खानचा SRA मध्ये जलवा! झोपडपट्टीधारकांना मिळालं हक्काचं घर

जयंत पाटलांना अर्थखातं मिळणार? फडणवीस-शिंदेंसोबत जयंत पाटलांची बैठक

SCROLL FOR NEXT