Yuzvendra Chahal-Dhanashree / instagram/dhanashree9 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma: अबब्..घटस्फोट झाला तर चहलला द्यावी लागेल धनश्रीला इतकी पोटगी! वाचा सविस्तर

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. या अफवा खऱ्या ठरल्यास चहलला किती मालमत्ता धनश्रीला पोटगी म्हणून द्यावी लागेल? जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma : क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाच्या अफवा तेव्हा सुरू झाल्या, जेव्हा त्याची पत्नी धनश्री वर्माने तिच्या नावातून 'चहल' हे आडनाव काढून टाकले. त्यावेळेस युझवेंद्रने या अफवांचे खंडन केले होते, पण आता दोन्ही स्टार्सनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. युझवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्मासोबतचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून हटवले आहेत. त्यांनतर त्याच्या घटस्फोटाच्या अफवाना उधाण आला आहे. पण जर या दोघांचा खरंच घटस्फोट झाला तर धनश्रीला पोटगी म्हणून किती मालमत्ता मिळेल याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

युझवेंद्र चहल हा क्रिकेटमधून भरपूर पैसा कमावतो. त्याला आयपीएल फ्रँचायझीने 18 कोटी रुपयांची त्याच्यावर बोली लावली होती. तसेच जाहिरातींमधूनही तो भरपूर कमाई करतो.तर दुसरीकडे, धनश्री वर्मा एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे, तिचे डान्स व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होतात. तिने काही टीव्ही शोमध्येही काम केले आहे. तिची कमाईही चांगली होत आहे. आता त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा शिगेला पोहोचल्याने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

युझवेंद्र चहल आणि धनश्री या दोघांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मालमत्तेचे विभाजन न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल. इथे धनश्रीचा निर्णयही महत्त्वाचा ठरणार आहे की तिला संपत्तीत भाग घ्यायचा आहे की नाही? ते त्यांच्या हक्कांसाठी न्यायालयात पोहोचू शकतात. विशेष म्हणजे या दोघांनीही घटस्फोटाच्या अफवांचे अद्याप खंडन केलेले नाही.

धनश्री वर्माचे बरेच फॉलोअर्स आहेत. धनश्रीचे तिच्या यूट्यूब चॅनलवर 2.79 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. तर तिच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याचे 6.2 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. असे म्हटले जाते की तिची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये आहे.तर, युझवेंद्र चहल हा उत्कृष्ट लेगस्पिनर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. युझवेंद्र चहलची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे. अर्थात युझवेंद्र चहलची संपत्ती धनश्री वर्मापेक्षा जास्त आहे.

धनश्री-युजवेंद्रची प्रेमकहाणी

धनश्री-युजवेंद्र यांचे २०२० साली लग्न झाले. लॉकडाऊनमुळे सर्व क्रिकेटपटू आपापल्या घरात बंदिस्त असताना युझवेंद्र आणि धनश्री वर्मा यांची प्रेमकथा बहरली. धनश्री एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे आणि जेव्हा युझवेंद्र डान्स शिकण्यासाठी तिच्याकडे आला तेव्हा डान्स शिकत असताना युझवेंद्र चहल धनश्री वर्माच्या प्रेमात पडला आणि ते एकमेकांना डेट करू लागले. 11 डिसेंबर 2020 रोजी त्यांचे लग्न झाले. धनश्रीने 'झलक दिखला जा 11' च्या मंचावर तिची प्रेमकहाणी सांगितली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

SCROLL FOR NEXT