Athira Shetty and KL Rahul Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

KL Rahul-Athiya Wedding: के.एल.राहुल-अथिया यांच्या लग्नविधींना सुरूवात, व्हिडिओ झाला व्हायरल...

अथिया आणि राहुलच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pooja Dange

KL Rahul-Athiya Viral Video: भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध क्लीन स्वीप करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. तर संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या त्याच्या लग्नाच्या विधींमध्ये व्यस्त आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि हा यष्टिरक्षक बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (23 जानेवारी) अथिया आणि केएल राहुल यांचे लग्न होणार आहे. या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, अथिया आणि राहुलच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.

अथिया ही बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. अथिया आणि राहुल गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक कार्यक्रमात दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. त्याचबरोबर अथिया आयपीएल आणि टीम इंडियाच्या मॅचदरम्यान अनेकदा स्टेडियममध्ये दिसली होती.

खंडाळ्यातील सुनीलच्या आलिशान बंगल्यात राहुल आणि अथियाचे लग्न होणार आहे. या सोहळ्यासाठी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीयांना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नात फक्त 100 पाहुणे राहणार आहेत, असे बोलले जात आहे.

23 जानेवारीला अथिया आणि राहुल पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत. तिथे उपस्थित पापराझींकडून सांगण्यात येत आहे की, 22 जानेवारीच्या रात्री दोघांच्या लग्नाचे संगीत होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सुनील शेट्टीचे सजवलेले घर दिसत आहे, या घरातून गाण्यांचा आवाज ऐकू येत आहेत. 'अभी तो पार्टी शुरू हुई है' सारख्या गाण्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. चाहते आता या जोडप्याच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

रविवारी सुनील शेट्टी यांनी त्यांच्या लाडक्या मुलीच्या आणि राहुलच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी हात जोडून मीडियाला भेटताना दिसत होते. त्याने मीडियाला वचन दिले की लग्नानंतर ते या जोडप्याला बंगल्यातून बाहेर येऊन पोज द्यायला सांगतील. सुनील म्हणाले, मी उद्या (सोमवारी) मुलांना घेऊन येतो. खूप खूप धन्यवाद.

काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी लग्नाच्या बातम्यांचे खंडन करताना दिसत होते. आता मात्र तो उघडपणे लग्नाबद्दल बोलत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू,पंढरपूरमधील घटना

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT