IIT Baba Prediction Ind vs Pak Match Saam Tv
मनोरंजन बातम्या

IND Vs PAK : भारताच्या विजयानंतर, IIT बाबाची फजिती; केली आणखी एक भविष्यवाणी

IIT Baba Prediction Ind vs Pak Match: टीम इंडियाने मॅच जिंकून आयआयटी बाबाचा अंदाज चुकीचा ठरवला आहे. यानंतर, आयआयटी बाबांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून सोशल मिडीयावर त्याला ट्रॉल केल जात आहे.

Shruti Vilas Kadam

Ind Vs Pak Prediction Failed: महाकुंभमेळ्यातून प्रसिद्ध झालेले अभय सिंग उर्फ ​​आयआयटी बाबा सध्या चर्चेत आहेत. यावेळी त्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल भाकित केले होते, जे चुकीचे ठरले. तो म्हणाला होता की भारतीय संघ हा सामना हरेल आणि पाकिस्तानी संघ जिंकेल.पण, भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेले २४२ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ४३ व्या षटकातच पूर्ण केले.

भाकित चुकले तेव्हा आयआयटी बाबांनी काय म्हटले?

भाकित चुकल्यानंतर, एका युट्युब चॅनेलने या विषयावर IIT बाबाशी चर्चा केली. जेव्हा भाकित चुकले तेव्हा आयआयटी बाबा म्हणाले, “पाहा, आपण जे खेळ खेळतो ते फक्त आपल्यासाठी खेळत नाहीत. कोणाच्याही भाकितावर कधीही विश्वास ठेवू नये. तुम्ही तुमचा मेंदू वापरला पाहिजे. विश्वास ठेवू नका. मी या नाही तर फायनल मॅचसाठी बोललो होतो. त्याच्या या विधानानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रॉल करण्यात येत आहे. तसेच त्याच्या विविध मिम्स देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अंडरग्राउंड होने का समय...

आयआयटी बाबांची भविष्यवाणी चुकीची ठरल्यानंतर, नेटकरी 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाच्या मीम टेम्पलेटचा वापर करून 'आता आयआयटी बाबांना अंडरग्राउंड होण्याची वेळ आली आहे 'असे विविध मिम्स बनवत आहेत.

आता मी त्याला शोधत आहे...

भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर, नेटकरी आयआयटी बाबाला मोठ्या उत्साहात शोधत आहेत. एका नेटकाऱ्याने आयआयटी बाबाचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले - मी आज त्याला शोधत आहे. आजूबाजूला कोणताही धक्काबुक्की होणार नाही. सर्वांनी कमेंटमध्ये एक एक करून बाबांना आशीर्वाद द्या. अशी गंमतीशीर पोस्ट करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT