सोनू सूद Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonu Sood : आयकर विभाग का लागला 'सोनू सूद'च्या मागे? 'ही' असू शकतात कारणं

आयकर विभाग बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मागे लागल्याचे दिसून येत आहे. सोनुने कोरोना काळात गरजू लोकांना खूप मदत केली होती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयकर विभाग बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) मागे लागल्याचे दिसून येत आहे. सोनुने कोरोना (Corona) काळात गरजू लोकांना खूप मदत केली होती. आता मुंबई (mumbai) आयकर विभाग त्याच्या मालमत्तांसंदर्भात सर्वेक्षण करत आहे. आयकर विभागाने त्याच्या कंपन्यांसंबंधी सुमारे 6 ठिकाणी सर्वेक्षण केल्याचे वृत्त आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे अलीकडे सोनू सूद दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासोबत दिसला होता, त्यात त्याने आम आदमी पक्षाचे (AAP) कौतुक देखील केले होते.

हे देखील पहा :

आता सोनू सूदवर करचुकवेगिरीचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले जाते की त्याने एका कंपनीसोबत (Company) केलेल्या करारात कर चुकवला होता, ज्यामध्ये लखनौमधील एका रिअल इस्टेट कंपनीचाही समावेश होता. आयकर विभाग (Income Tax Department) या कंपनीमध्येही सर्वेक्षण करत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार लखनौस्थित ही रिअल इस्टेट कंपनी आणि सोनू सूदच्या फर्ममध्ये जमिनीचा व्यवहार झाला आहे, ज्याचे आयकर विभाग सर्वेक्षण करत आहे.

पण सोनू सूदच्या आयकर चौकशीला राजकारणाशी जोडले जात आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटणे महागात पडल्याचे दिसत आहे. कारण तेव्हापासून तो राजकारणात (politics) प्रवेश करू शकतो अशी चर्चा होती. तथापि, सोनू सूदने आम आदमी पार्टीमध्ये सामील होण्याच्या वृत्ताला नाकारले होते. केजरीवाल यांच्या भेटीनंतर काही दिवसांनी सोनू सूदवर आयकर विभागाने धाड टाकली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT