Veena Jamkar and Vanita Kharat PR
मनोरंजन बातम्या

Ilu Ilu Movie : वीणा आणि वनिता झाल्या शेजारी शेजारी

Ilu Ilu Marathi Movie : अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ ही मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री वीणा आणि वनिता एकमेकींच्या शेजारी राहत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ilu Ilu Movie : ‘नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा असतो. सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात. अभिनेत्री वीणा जामकर आणि विनोदाचं जबरदस्त टायमिंग असलेली अभिनेत्री वनिता खरात या दोघी अभिनेत्री आता सख्ख्या शेजारी झाल्या असून आगामी ‘इलू इलू’ या चित्रपटात त्या शेजारधर्म निभावताना दिसतील. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ ही मनोरंजक लव्हस्टोरी ३१ जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे.

पूर्वीच्या चाळ संस्कृतीमध्ये शेजारी हे अगदी आप्त स्वकियांसारखे असायचे. सगळ्या सुख दुःखा मध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यातून अनेक गमतीदार किस्से घडायचे, या चित्रपटातही त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

या चित्रपटाच्या निमिताने वीणा जामकर आणि वनिता खरात या दोघी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. संगीता सुर्वे आणि जाधव बाई या व्यक्तिरेखेत त्या दिसणार आहेत. ‘आम्ही दोघींनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून एकत्र काम करताना खूप मजा आल्याचं या दोघी सांगतात. धमाल अनुभव असणारा ‘इलू इलू’ चित्रपट प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास दोघी व्यक्त करतात’.

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT