alia bhatt instagram Alia Bhatt (Instagram/@aliaabhatt)
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt : नाव बदलण्याचा प्रश्नवर आलियाचे भन्नाट उत्तर म्हणाली, 'मी नेहमी...

एका मुलाखतीत आलियाला तिचे नाव बदलण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे आलियाने एकदम भन्नाट उत्तर दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची पटाखा गुड्डी म्हणजेच आलिया भट्ट(Alia Bhatt) ही बॉलिवूडमधील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या आलिया तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यातच आलिया भट्ट अभिनेता रणबीर कपूरसोबत(Ranbir Kapoor) विवाह बंधनात अडकली. आता हे कपल लवकरच आई-बाबा होणार आहे. लग्न झाल्यानंतर आलिया तिचं काम अधिक उत्साहाने करत आहे. नुकतेच एका मुलाखतीत आलियाला तिचे नाव बदलण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे आलियाने एकदम भन्नाट उत्तर दिले आहे.

लग्नानंतर आलियाने तिच्या नावासमोर कपूर आडनाव का लावले नाही असा तिला मुलाखतीत प्रश्न विचारला असता याच उत्तर देत आलिया म्हणाली 'सोशल मीडियावर आणि कामात माझं नाव आलिया भट्ट असच असेल आणि मी नेहमीच भट्टच राहीन. पण मी कागदोपत्री माझं नाव बदलून आलिया भट्ट-कपूर असे करणार आहे आणि याचा मला खूप आनंद आहे'.

आलिया पुढे म्हणाली, की तिच्या बिजी शेड्यूलमुळे आणि इंटरनेशनल प्रोजेक्टमुळे तिला पासपोर्टवर नाव बदलण्यासाठी वेळ मिळाला नाही. आलिया त्याच्या हॉलिवूड डेब्यू सिनेमा 'हार्ट ऑफ स्टोन'साठी एक महिना यूकेमध्ये होती. रणबीरने लगेचच पासपोर्टवर वैवाहिक असा स्टेट्स बदलल्यानंतर आलिया म्हणाली की, 'आता आम्हाला बाळ होणार आहे. मी कपूर कुटुंबासोबत राहत असताना भट्ट म्हणून नाव लावू शकत नाही'.

आलिया आणि रणबीर कपूर एप्रिल २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी जूनच्या अखेरीस आलिया आणि रणबीर आपल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT