kriti sanon saam Tv
मनोरंजन बातम्या

मिका सिंगनंतर आता 'या' अभिनेत्रीलाही करायचंय स्वयंवर; कुणी यावं हेही सांगितलं

एका टॉक शोमध्ये क्रितीने स्वत:साठी स्वयंवर आयोजित करण्याच्या तिच्या इच्छेबद्दल सांगितले. प्रत्येक अभिनेत्याने त्यात सहभागी व्हावे असे देखील तिने या शोमध्ये सांगितले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन(kriti sanon) नेहमीच चर्चेत असते. हल्ली सोशल मीडियावर क्रिती सेननच्या स्वयंवराबद्दल चर्चा रंगत आहेत. क्रिती सेननला तिचे स्वयंवर करायचे आहे. या स्वयंवरात विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda), कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर आणि अगदी रायन गोसलिंगपर्यंतचे सुपरस्टार सहभागी व्हावे अशी क्रितीची इच्छा आहे. अलीकडेच एका टॉक शोमध्ये क्रितीने स्वत:साठी स्वयंवर आयोजित करण्याच्या तिच्या इच्छेबद्दल सांगितले. प्रत्येक अभिनेत्याने त्यात सहभागी व्हावे असे देखील तिने या शोमध्ये सांगितले.

एका लाइव्ह शो दरम्यान, क्रिती म्हणाली, 'विजय देवरकोंडा खूप छान दिसतो आणि तो मला समजूतदारही वाटतो. मी त्याच्या काही मुलाखतीही पाहिल्या आहेत आणि तो खूप प्रामाणिक आणि समजूतदार आहे. तो स्वयंवरमध्ये सहभागी होऊ शकतो. त्याचबरोबर कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूर देखील सहभागी होऊ शकतात. अजून कोणी अविवाहित सुपरस्टार सहभागी होऊ इच्छित असेल तर माझी काही हरकत नाही. तसेच मला रायन गॉसलिंगसोबत काम करायला आवडेल आणि तो माझ्या स्वयंवरमध्ये असावा अशी माझी इच्छा आहे.'

क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, क्रितीने २०१४ मध्ये टायगर श्रॉफसोबत 'हीरोपंती' या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. क्रिती 'भेडिया', 'गणपत', 'आदिपुरुष' आणि 'शेहजादा' यांसारख्या बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

SCROLL FOR NEXT