Actress Neha Joshi got married in a simple way
Actress Neha Joshi got married in a simple waySaam Tv

ना बँडबाजा, ना वरात...कसलाच गाजावाजा न करता मराठमोळ्या अभिनेत्रीनं केलं लग्न

मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Published on

मुंबई: मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशीने(Neha Joshi) मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान पक्कं केलंय. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक तसेच खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिकंलेली ही अभिनेत्री पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. नेहानं नुकतंच सोशल मीडियावर(Social Media) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Actress Neha Joshi got married in a simple way
Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीचा डान्स बघाच; कौतुक करावं तितकं थोडंच!

नुकतंच नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये नेहा नववधूच्या वेशभूषेत दिसतेय. मुंडावल्या बांधलेल्या दिसत आहेत. याचबरोबर फोटोवर तिने 'जीवनातील नव्या भूमिकेत' अशी सुंदर कॅप्शन दिली आहे. तर आणखी एका फोटोमध्ये नेहा ही अभिनेता ओंकार कुलकर्णीसोबत दिसते आहे. ज्यामध्ये दोघांनीही मुडांवळ्या बांधल्या आहेत. या फोटोवर तिने 'लग्न झाले' अशी कॅप्शन दिली आहे.

नेहाने शेअर केलेल्या पोस्टवरून त्यांचे लग्न झाल्याचे समजते आहे. मराठी सेलिब्रेटीचं लग्न म्हणजे चर्चा तर झालीच पाहिजे. मात्र या अभिनेत्रीने कोणताही गाजाबाजा न करता अंत्यत साध्या पद्धतीने लग्न केले आहे. नेहाने हे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. नेहाच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनी कमेंट करत या नवदाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Actress Neha Joshi got married in a simple way
Cuttputlli Teaser: अक्षय कुमार-रकुल प्रीत सिंगच्या 'कठपुतली'चा टीझर आला, 'मिस्टर खिलाडी' दमदार भूमिकेत

दरम्यान, अलीकडेच एका मुलाखतीत नेहा म्हणाली होती, लग्न ही माझ्यासाठी अत्यंत खासगी गोष्ट आहे. आणि यासाठीच मी अगदी साध्या पद्धतीने, कुठलाही गाजावाजा न करता लग्न केलं आहे. मी माझ्या काही मोजके कुटुंबीय आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे.

ओंकार कुलकर्णी हा लेखक आणि दिग्दर्शक आहे. नाटक आणि शॉर्टफिल्मचे देखील त्याने लेखन केले आहे. 'नॉक-नॉक' या नाटकातून नेहा आणि ओंकार यांची एकमेकांशी ओळख झाली. नाटकाचे लेखन ओंकारने केले असून त्यात नेहाने मुख्य भूमिका साकारली आहे. नेहा जोशी आणि ओंकार कुलकर्णी गेली अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेक प्रोजेक्ट्समध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे.

नेहा जोशीने 'ऊन पाऊस' या मालिकेतून तिचा प्रवास सुरू केला आहे. अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून, तसेच हिंदी चित्रपटांत देखील तिने काम केलं आहे. 'का रे दुरावा' या लोकप्रिय मालिकेतून रजनीचे बिनधास्त पात्र साकारत नेहा घराघरांत पोहोचली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com