Boycott Trend: बॉयकॉट ट्रेंडवर विजय देवरकोंडाही सडेतोड बोलला; आमिरला पाठिंबा देतानाच...

बॉयकॉट ट्रेंडवर विजय देवरकोंडानेही रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
Boycott Trend
Boycott TrendSaam Tv
Published On

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा(vijay deverakonda) सध्या 'लाइगर'(Liger) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तो बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. हा चित्रपट २५ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीनंतर आता प्रेक्षकांना विजय देवरकोंडाच्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्या 'लाल सिंह चड्ढा' (#BoycottLaalSinghCaddha) चित्रपटाला सोशल मीडियावर बहिष्काराला सामोरे जावे लागले आहे, याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर स्पष्टपणे दिसून आला आहे. आता या बॉयकॉट ट्रेंडवर विजय देवरकोंडानेही रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

Boycott Trend
ना बँडबाजा, ना वरात...कसलाच गाजावाजा न करता मराठमोळ्या अभिनेत्रीनं केलं लग्न

'लाइगर' चित्रपटाच्या एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान, विजय देवरकोंडाला विचारण्यात आले की बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल त्याचे काय मत आहे? या प्रश्नावर उत्तर देत विजय म्हणाला, 'कलाकार आणि दिग्दर्शकांव्यतिरिक्त अनेक लोक चित्रपटात काम करत असतात. एका चित्रपटावर २०० ते ३०० लोक काम करतात. एका चित्रपटामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो. 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातही अनेकांनी काम केले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेता, तेव्हा त्याचा परिणाम केवळ आमिर खानवरच नाही तर हजारो कुटुंबांवर होतो. त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होतो'.

Boycott Trend
Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीचा डान्स बघाच; कौतुक करावं तितकं थोडंच!

विजय देवरकोंडा पुढे म्हणाला, 'आमिर सर हे थिएटरमध्ये गर्दी खेचतात. बहिष्कार का होत आहे हे मला माहीत नाही. पण कोणत्याही गैरसमजामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय, आमिर खानवर नाही. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या 'लाइगर' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात विजय बॉक्सरची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर लोकांना आवडला आहे. या चित्रपटात रम्या कृष्णनचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय माईक टायसन चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांचा हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com