Ileana D'Cruz
Ileana D'Cruz Instagram @ileana_official
मनोरंजन बातम्या

Ileana D'Cruz Admitted: अभिनेत्री इलियाना डिक्रूज रुग्णालयात, अचानक असे काय घडले?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ileana D’Cruz admitted to hospital: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज आजारी आहे. इलियानाची प्रकृती इतकी खालावली आहे की तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करून स्वतः ही माहिती दिली आहे. तिला रुग्णालयात अॅडमिट झालेले पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. फोटोमध्ये इलियाना अशक्त दिसत आहे. तसेच तिच्या हाताला ड्रिप दिसत आहे.

३० जानेवारीला इलियानाने तिच्या तब्येतीबाबत एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली होती. इलियानाने फोटोवर लिहिले आहे की, 'डिहायड्रेशनवर उपचार करण्यासाठी 3 पिशव्या आयव्ही फ्लूइड्स चढविण्यात येत आहे'. अचानक प्रकृती बिघडल्याने इलियानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इलियानाने इंस्टाग्राम स्टोरीवर 2 फोटो शेअर केले करत लिहिले आहे की, 'एक दिवस कीती बदल आणतो'. काही चांगले डॉक्टर आणि 3 पिशव्या आयव्ही हवे होते. दुसर्‍या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे, 'माझ्या प्रकृतीबद्दल सतत मेसेज करणाऱ्या सर्वांचे आभार. तुम्हा सर्वांना माझी काळजी आहे त्यासाठी तुम्हा सर्वनेखूप आभार. मी आता ठीक आहे. मला वेळेवर उपचार मिळाले.'

Ileana D’Cruz Instagram Story

इलियाना तिच्या तब्येतीविषयी अनेकदा सांगितले आहे. तिला बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर असल्याचे तिने आधीही सांगितले होते. एक वेळ अशी आली की या आजाराने ती इतकी त्रस्त झाली होती की तिने आयुष्य संपवण्याचा विचार केला होता. आता मात्र ती यातून बाहेर पडली आहे. इलियानाने बर्फी, रुस्तम, मैं तेरा हीरो आणि बादशाहो यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

शेतकरी हळहळले! विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यु,10 लाखांचे नुकसान

Kothimbir Vadi: पावसाळ्यात बनवा खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वडी; हटके रेसीपी

Pandharpur Drought : पाणी नसल्याने द्राक्षबाग सुकली; दुष्काळामुळे बाग काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ

SCROLL FOR NEXT