Hutatma web series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hutatma: 'हुतात्मा' वेबसीरीज हटवण्यामागचं खरं कारण काय? शिवसेनेच्या अखिल चित्रे यांचा थेट सवाल

Hutatma web series: संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारित ‘हुतात्मा’ वेबसीरीज ओटीटीवरून हटवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. शिव संचार सेना अध्यक्ष अखिल चित्रेंनी यामागे राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Shruti Vilas Kadam

Hutatma web series: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास आणि मुंबईसाठी मराठी माणसाने दिलेल्या संघर्षावर आधारित ‘हुतात्मा’ ही वेबसीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवरून अचानक हटवण्यात आल्याने राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयामागचं खरं कारण काय? असा थेट सवाल शिवसेना पुरस्कृत शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी उपस्थित केला असून, यामागे राजकीय व वैचारिक दबाव असल्याचा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

‘हुतात्मा’ ही वेबसीरीज संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनाचा, मराठी माणसाच्या बलिदानाचा आणि मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी दिलेल्या लढ्याचा सखोल आढावा घेते. मात्र, अशा ऐतिहासिक आशयाची मालिका ओटीटीवरून हटवण्यात येणे म्हणजे मराठी इतिहास जनतेपर्यंत पोहोचू न देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप चित्रे यांनी केला आहे.

अखिल चित्रे यांनी स्पष्ट शब्दांत विचारले की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील तत्कालीन सत्ताधाऱ्यांची भूमिका, विशेषतः मोरारजी देसाई यांचा विरोधी दृष्टिकोन आणि मुंबईसंदर्भातील निर्णय नव्या पिढीसमोर येऊ नयेत, यासाठीच ही वेबसीरीज हटवण्यात आली का? आजही “आधुनिक मोरारजी देसाई” मानसिकता महाराष्ट्रद्वेष पसरवत आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी या निर्णयामागील हेतूंवर बोट ठेवलं आहे.

तसेच, त्या काळात भाजपा किंवा तत्कालीन जनसंघ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कुठेच नव्हता, हा ऐतिहासिक मुद्दा समोर येऊ नये म्हणूनच ‘हुतात्मा’ हटवण्यात आली का? असा थेट आरोपही त्यांनी केला. वेबसीरीजला व्यावसायिक प्रतिसाद मिळाला नाही, हे कारण देणं म्हणजे “थुकरट उत्तर” असल्याचं सांगत त्यांनी अनेक दर्जाहीन आणि आशयहीन वेबसीरीज आजही ओटीटीवर उपलब्ध असल्याकडे लक्ष वेधलं.

हुतात्मा’ ही वेबसीरीज तातडीने पुन्हा सार्वजनिक करावी, अशी ठाम मागणी करत अखिल चित्रे म्हणाले की, मराठी माणसाला आपल्या पूर्वजांचा संघर्ष, बलिदान आणि इतिहास माहिती असायलाच हवी. मुंबई महाराष्ट्राला लढून मिळवली आहे आणि ती लढूनच टिकवावी लागेल, हा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक आहे. अन्यथा, इतिहास पुसण्याच्या या प्रयत्नाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार

Designer Sarees: न्यू ईअर पार्टीला सगळ्यात हटके दिसायचंय? मग या ४ लेटेस्ट डिझाइनर साड्या आत्ताच करा खरेदी

Pune : ना जागावाटप, ना उमेदवार; नुसत्याच चर्चा, जोरबैठका; पुण्यात कन्फ्युजनही कन्फ्युजन, सोल्यूशनचा पत्ताच नाही!

गुप्त ठिकाणी बैठक, हातात बंद लिफाफे मनसे आणि ठाकरे गटात नेमकं काय घडतंय? VIDEO

T20 World Cup : ३६ चेंडूंत १००, ८४ चेंडूंत १९० धावा; वैभव सूर्यवंशीला टी २० वर्ल्डकप संघात घ्या, दिग्गज खेळाडूची मागणी

SCROLL FOR NEXT