hum hindustani 
मनोरंजन बातम्या

एकात्मतेवरील 'हम हिंदुस्तानी' गाणे रिलीज; नेटीझन्सच्या उड्या

Siddharth Latkar

सातारा : दोन दिवसांनी देशाचा स्वातंत्र्य दिन Independence Day आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन तसा खासच आहे. यंदा सारे भारतीय ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. त्याचबरोबर ऑलिम्पिकमधील देशाच्या जबरदस्त कामगिरीनंतर नागरिकांमध्ये देशभक्तीची एक वेगळीच लाट उसळली आहे. तर दुसरीकडे कोरोना साथीच्या लढाईतही, सर्व देशवासियांनी खूप संयम आणि धैर्य दाखवले. या लढ्यात सामान्यांपासून ते अब्जादीश लाेक एकमेकांचे आधार बनले. याच एकात्मतेवर आधारित एक गाणे, जे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर बनवण्यात आले आहे ते आज रिलीज झाले. 'हम हिंदुस्तानी' hum hindustani असे या गाण्याचे नाव आहे.

या गाण्याची घोषणा अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. जे आज काही तासांपूर्वी रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर तुम्हालाही देशाच्या सद्य परिस्थितीशी लढण्यासाठी खूप धैर्य मिळेल. गायकांपासून अभिनेत्यांपर्यंत प्रत्येकाने गाण्यास आपला आवाज दिला आहे. व्हिडिओची सुरुवात दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजाने होते. यानंतर अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येतो.

लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सोनू निगम, पद्मिनी कोल्हापुरी, कैलाश खेर, सोनाक्षी सिन्हा, अलका याज्ञिक, तारा सुतारिया, सिद्धांत कपूर, श्रद्धा कपूर, शब्बीर कुमार, अंकित तिवारी, श्रुती हसन आणि जन्नत जुबैर असे अनेक दिग्गज या व्हिडिओत दिसत आहेत.

जे त्यांच्याच आवाजात गाणे गाताहेत. अमिताभ यांचा आवाजात 'आज पूरा भारत ये कहना चाह रहा है' असे म्हणत आहेत. हम हिंदुस्थानी हे गाणे धमाका रेकॉर्ड्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आले आहे. ज्याची निर्मिती प्रियांक शर्मा आणि पारस मेहता यांनी संयुक्तपणे केली आहे. या गाण्याचे संगीत दिलशाद शब्बीर शेख यांनी दिले असून गीत कशिश कुमार यांनी लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

SCROLL FOR NEXT