Hrithik Roshan Girlfriend Saba Azad Hospitalised  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Hospitalised: 'वजन कमी झालं, चालताही येत नाही...'; हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादला रुग्णालयात केलं दाखल

Actress Hospitalised: अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद आजारी पडली आहे. सबाने सांगितलं की या काळात हृतिकने तिची खूप काळजी घेतली आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Hospitalised: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री-गायिका सबा आझाद सध्या गंभीर आजारामुळे त्रस्त असून रुग्णालयात उपचार घेत आहे. सबाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहते चिंतेत आहेत.

आता चालताही येत नाही...

सबा आझादने रुग्णालयाच्या बेडवर पडलेला एक फोटो शेअर करत लिहिले की, "माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट १४ दिवस. सायक्लोस्पोरा कायटेनेन्सिस (Cyclospora cayetanensis), तू खूप वाईट आजार आहेस. माझ्यासारख्या, जी फक्त घरचे जेवण खाते आणि नेहमी स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवते, तिला हा विषाणू कुठून आला याचे मला आश्चर्य वाटते आणि तेही वर्षाच्या सर्वात व्यस्त काळात. माझे वजन आधीच खूप कमी आहे त्यात दोन आठवड्यांत माझे ४ किलो वजन कमी झाले आहे. आता चालताही येत नाही."

भाज्या साफ धुवा

'साधे चालणेही कठीण झाले आहे' असे सांगताना सबाने तिची अवस्था किती गंभीर आहे, याची जाणीव करून दिली. ती म्हणाली की, मी दिवसातून दोनदा पुल-अप्स, जड वजन उचलण्याचा व्यायाम करत होते आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या शरीराचा आकार निम्मा झाला होता. वजन उचलणे तर दूरच, माझ्यात एक साधी टूथपिक उचलण्याचीही ताकद उरली नव्हती. म्हणून, कृपया, तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी, भाज्या साफ धुवा. कारण कधीकधी त्यामुळे तुम्ही आजारी पडता. बेकिंग सोडा + व्हेजी वॉश."

हृतिक रोशनने केली सेवा

सबाने पुढे लिहिले की तिचा हा फोटो हृतिक रोशनने काढला आहे. सबाने लिहिले, "हृतिक माझ्या सर्वात चिडचिड्या मूडमध्ये माझ्यासोबत होता. तो नेहमीच कठीण परिस्थितीतही मला हसवतो खूश करतो." तिने पुढे लिहिले, "मी या फोटोमध्ये दिसते तितकी अशक्त किंवा लहान झालेली नाही." खरं तर हा बेड खूप मोठा आहे आणि फोटोचा अँगलही खूप मोठा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT