Housefull 5 Teaser Release SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Teaser Release: "किलर कॉमेडी अन्...," रितेश-अक्षयच्या 'हाऊसफुल 5'चा धमाकेदार टीझर, पाहा VIDEO

Housefull 5 : 'हाऊसफुल 5' चित्रपटाचा नुकताच धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Shreya Maskar

बहुप्रतिक्षित चित्रपटाचा अखेर टीझर रिलीज करण्यात आला आहे. नवीन वर्षात अनेक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता 'हाऊसफुल 5'ची (Housefull 5 Teaser Release ) भर पडली आहे. नुकताच 'हाऊसफुल 5'चा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचा टीझर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'हाऊसफुल 5' चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. चित्रपटातील कलाकारांची झलक टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटातील त्यांचे अवतार पाहून सिनेमा खूपच कॉमेडी असणार आहे, असे दिसत आहे. रितेश देशमुखने या टीझरला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "आजपासून १५ वर्षांपूर्वी...वेडेपणाची सुरुवात झाली! भारताची सर्वात मोठी फ्रँचायझी 5व्या भागासोबत परत आली आहे आणि यावेळी ती केवळ गोंधळ आणि विनोदी नाही... तर एक किलर कॉमेडी!"

'हाऊसफुल 5'च्या टिझरवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन ,जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त ,नर्गिस फाखरी, फरदीन खान, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. कॉमेडीची ही मेजवानी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कलाकारांचा वेगळा अंदाज दिसणार आहे.

'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हाऊसफुल' पहिल्या चार भागांना देखील चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कामगिरी केली. चित्रपटातील गाणी आजही खूप गाजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT