Samantha Ruth Prabhu Temple: फॅन असावा तर असा! समांथा प्रभूचं चाहत्यानं बांधलं भव्य मंदिर, पाहा VIDEO

Samantha Ruth Prabhu Temple Video : समांथा रुथ प्रभूचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या एका चाहत्याने चक्क समांथाचे मंदिर बांधले आहे. याचा सुंदर व्हिडीओ पाहा.
Samantha Ruth Prabhu Temple Video
Samantha Ruth Prabhu TempleSAAM TV
Published On

दाक्षिणात्य सुपरस्टार सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अलिकडेच सामंथाच वाढदिवस साजरा करण्यात आला. सामंथा रुथ प्रभू 28 एप्रिलाल 38 वर्षांची झाली. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या फॅनने तिला भन्नाट गिफ्ट दिले आहे. सामंथा रुथ प्रभूच्या चाहत्याने तिचे मंदिर बांधले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चाहत्याने सामंथाच्या बांधलेल्या नवीन मंदिरात तिचा वाढदिवस साजरा केला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लहान मुल सामंथाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. त्यांनी सामंथाच्या वाढदिवसाचा केक देखील कापला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंदिराला समांथाचे नाव देण्यात आले आहे. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवलेले आहे. व्हिडीओमध्ये सामंथा रुथ प्रभूचे दोन पुतळे पाहायला मिळत आहे. एक पुतळा सोनेरी रंगाचा आहे तर दुसरा पुतळा लाल रंगाची साडी नेसलेला आहे. दोन्ही पुतळे खुपच सुंदर आणि आखीव रेखीव दिसत आहे.

व्हिडीओमध्ये सर्वजण सामंथा रुथ प्रभूला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देताना दिसत आहेत. सामंथा रुथ प्रभूचे हे भव्य मंदिर बांधणाऱ्या फॅनचे नाव तेनाली संदीप आहे. ते मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, मी तेनाली संदीप... मी आंध्र प्रदेशमधला राहणारा असून मी समांथाचा मोठा फॅन आहे. गेल्या तीन वर्षापासून मी सामंथाचा वाढदिवस साजरा करत आलो आहे. समांथाची परोपकाराची वृत्ती मला खूप प्रेरणा देते.

सामंथा रुथ प्रभू कायम तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आजवर तिने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. सामंथा रुथ प्रभूच्या आगामी प्रोजेक्टचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Samantha Ruth Prabhu Temple Video
Zapuk Zupuk Box Office Collection : 'टॉपचा किंग' बॉक्स ऑफिसवर सुसाट, 'झापुक झुपूक'ने पार केला १ कोटींचा टप्पा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com