Housefull 5 mishap  india Today
मनोरंजन बातम्या

Housefull 5 चित्रपटाच्या सेटवर दुर्घटना; अभिनेता अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत

Housefull 5 mishap : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. शूटिंगदरम्यान अक्षय कुमार जखमी झालाय. त्याच्या डोळ्याला दुखापत झालीय. अक्षय त्याच्या आगामी 'हाऊसफुल 5' चित्रपटाचे शूटिंग करत असताना हा अपघात झाला.

Bharat Jadhav

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार जखमी झाल्याची घटना घडलीय. अक्षय त्याचा आगामी चित्रपट हाऊसफुल 5 चे शूटिंग करत होता. यादरम्यान सेटवर एक अपघात झाला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार जखमी झाल्याची माहिती मिळाली अशसून त्याच्या डोळ्याला दुखापत झालीय. हा अपघात झाला तेव्हा अक्षय कुमार या चित्रपटाच्या ॲक्शन सीनचे शूटिंग करत होता.

'हाऊसफुल 5'च्या सेटवर अचानक काही गोष्टी त्याच्या अंगावर पडल्या, ज्यामुळे अक्षय कुमार जखमी झाला. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अक्षयच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.

अपघातानंतर अक्षय कुमारला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. अक्षय कुमार त्याच्या कामाबद्दल खूप गंभीर असून तो त्याचे स्टंटही तो जवळजवळ स्वतःच करतो. सेटवर प्रत्येक प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतली जात असते, मात्र कधी कधी असे अपघात होतात. हाती आलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारला गंभीर दुखापत झालेली नसून, त्याला आराम करण्यास सांगण्यात आले आहे.

चित्रपटाचे चित्रीकरण काही काळ नक्कीच थांबवण्यात आले होते,मात्र त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. आता अक्षय कुमारचे सीन्स सध्या थांबवण्यात आले आहेत. तो बरा झाल्यानंतरच हे सीन्स शूट केले जातील. अक्षय कुमार खूप वक्तशीर आहे. त्याला त्याच्या चित्रपटांची शूटिंग वेळेवर पूर्ण करायला आवडते. त्यामुळे तो लवकरच बरा होऊन शूटिंगवर परतण्याची शक्यता आहे.

हाऊसफुल 5 मध्ये अक्षय कुमारसोबत रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, चंकी पांडे, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, फरदीन खान यांच्यासह अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. तरुण मनसुखानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, हा चित्रपट 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाचे शूटिंग युरोपमध्ये सुरू झाले होते. कलाकारांनी 40 दिवसांसाठी क्रूझ जहाजावर चित्रपट शूट केला. यात ज्यात न्यूकॅसल ते स्पेन, नॉर्मंडी, हॉन्फ्लूर आणि परत प्लायमाउथच्या प्रवासाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

SCROLL FOR NEXT