Housefull 5 Worldwide Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Worldwide Collection : 'हाऊसफुल ५'ची जगभरात क्रेझ, वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

Housefull 5 Box Office Collection Day 12 : अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांचा कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल 5' जगभरात धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने 12 दिवसांत जगभरात किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'हाऊसफुल 5' (Housefull 5) हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. या चित्रपटात फुल कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'हाऊसफुल 5' दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो. प्रेक्षकांना हे दोन्ही क्लायमॅक्स खूप आवडत आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 12

अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटाने 12 दिवसांत सिनेमाचे बजेट वसूल केले आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई केली. या 'हाऊसफुल 5'चा बजेट तबल 225 कोटी रुपये होता. मीडिया रिपोर्टनुसार, आता 'हाऊसफुल 5'चे वर्ल्डवाइड कलेक्शन तब्बल 250 कोटीच्या आसपास झाले आहे. तर बॉक्स ऑफिसवरवर 12 दिवसात 162.15 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाने बाराव्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 13 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 11.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 7 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 6 कोटी रुपये

  • नववा दिवस - 9.5 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 11 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 4.25 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 4.12 कोटी रुपये

  • एकूण - 162.15 कोटी रुपये

'हाऊसफुल 5' स्टारकास्ट

बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल 5'मध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी धुमाकूळ घातला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT