Housefull 5 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर अक्षयच्या 'हाऊसफुल 5'ची जादू फेल, ६व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Housefull 5 Box Office Collection Day 6: अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने सहाव्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'हाऊसफुल 5' (Housefull 5) 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. चित्रपटाला अक्षय कुमार, रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन यांची कॉमेडीने चारचाँद लावले आहे. 'हाऊसफुल 5' हा चित्रपट सुरुवातीपासून त्याच्या दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 6

'हाऊसफुल 5' चित्रपट आता लवकरच 120 कोटी रुपयांचा व्यवसाय करणार आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कलेक्शन केले आहे. मात्र आता दिवसेंदिवस चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट होताना पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5'चा बजेट तबल 225 कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे सहाव्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 13 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 11.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 8 कोटी रुपये

  • एकूण - 119.75 कोटी रुपये

अक्षय, रितेश आणि अभिषेकसोबत या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी धुमाकूळ घातला आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.

'हाऊसफुल 5' चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.'हाऊसफुल 5' थिएटरमध्ये गाजल्यावर घरबसल्या तुम्हाला पाहता येणार आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT