Housefull 5 Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Housefull 5 Box Office Collection : 'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अक्षय कुमारच्या चित्रपटानं पार केला ५० कोटींचा टप्पा

Housefull 5 Box Office Collection Day 2: अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने दोन दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल 5' (Housefull 5) 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट त्याच्या वेगवेगळ्या आणि धमाकेदार क्लायमॅक्समुळे चांगला चर्चेत आहे. याची कौतुक प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात करत आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. 'हाऊसफुल 5' चे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 2

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 30 कोटी रुपये

  • एकूण - 54 कोटी रुपये.

मीडिया रिपोर्टनुसार, 'हाऊसफुल 5' ने पहिल्या दिवशी भारतात 24 कोटी आणि जगभरात 40 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या शनिवारी चित्रपटाने अंदाजे 30 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन अंदाजे 54 कोटी रुपयांच्यावर झाले आहे. आता 'हाऊसफुल 5' चित्रपट रविवारी किती रुपयांचे कलेक्शन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'हाऊसफुल 5' स्टारकास्ट

'हाऊसफुल 5'मध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन हे त्रिकूट पाहायला मिळत आहे. तर जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी यांचा ग्लॅमरस अंदाज चित्रपटात पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मराठी अभिनेते नाना पाटेकर आणि श्रेयस तळपदे यांचा देखील समावेश आहे. तसेच संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ देखील चित्रपटाचा भाग आहे. प्रेक्षक त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत आहे.

'हाऊसफुल'

'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. याआधी रिलीज झालेले 'हाऊसफुल' चे 4 ही भाग सुपरहिट झाले. आता 'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

'हाऊसफुल 5' ओटीटी अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, 'हाऊसफुल 5' चित्रपटाचे बजेट 225 कोटी रुपये आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या दोन दिवसांत चित्रपटाने 50 कोटींचे कलेक्शन केले आहे. लवकरच 'हाऊसफुल 5' आपले बजेट देखील वसूल करेल. 'हाऊसफुल 5' चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT