Yo Yo Honey Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Honey Singh File Complaint: हनी सिंगसोबत नेमकं घडलं काय? आधी शोमध्ये गाणं गायलं अन् नंतर थेट पोलीस स्टेशन गाठलं

Honey Sing News: पैसे देण्यावरून कार्यक्रमाचे आयोजक आणि हनी सिंग यांच्यात वाद झाला.

Pooja Dange

संजय गडदे

Honey Singh File Complaint Against The Organiser: रॅपर आणि गायक हनी सिंग विरोधात आज सकाळी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. एका इव्हेंट कंपनीच्या मालकाने हनी सिंग आणि त्याच्या संबंधित काही व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये या कंपनीच्या मालकाने हनी सिंगवर अपहरण, मारहाण आणि धमकावल्याचा आरोप केला होता.

या आरोपानंतर आता हनी सिंगने या कंपनीचा मालकाविरोधात (आयोजक) तक्रार केली आहे. या तक्रारीत हनी सिंगने आयोजकाने त्याला शोचे पैसे दिले नसल्याचे म्हटले आहे. (Latest Entertainment New)

मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात शनिवारी हनी सिंगचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला हनी सिंगने उपस्थित राहून गायनही केले. मात्र हनी सिंगला या कार्यक्रमाचे पैसे देण्यात आले नाहीत. पैसे देण्यावरून कार्यक्रमाचे आयोजक आणि हनी सिंग यांच्यात वाद झाला.

या वादावादी नंतर हनी सिंग याने कार्यक्रमाच्या आयोजकाविरोधात मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करत अर्ज दिला आहे. या अर्जावरून बीकेसी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

हनी सिंग नुकताच त्याच्या ब्रेकअप मधून सावरला आहे. त्याच्या ब्रेकअपचा परिणाम त्याच्या म्युजिक व्हिडिओवर झाला. त्यामुळे त्याचा अल्बम ३ महिने उशिरा प्रदर्शित झाला आहे.

सप्टेंबर २०२२ ला हनी सिंगचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये तो पुन्हा नव्या नात्यात आला होता. हनी सिंगने दिल्लीतील एका कार्यक्रमात टीना थडानीला डेट करत असल्याची घोषणा केली आहे. हनी सिंगने काही महिन्यांपूर्वी पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिला होता.

हनी सिंगने विरोधात नागपूर न्यायालयात खटला सुरु आहे. अश्लील नृत्य आणि गीते सादर केल्या प्रकरणी नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन मध्ये 2015 साली तक्रार दाखल करण्यात आली होती. 2014 ला अश्लील गाणं युट्युबवरती अपलोड केल्याप्रकरणी त्याच्यावर ती गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच गाण्याचं आज सॅम्पल घेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT