Vin Diesel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vin Diesel: 'त्याने हॉटेलमध्ये बोलावून माझ्यासोबत...', हॉलिवूड सुपरस्टार विन डिझेलवर असिस्टंटने केले लैंगिक अत्याचाराचे आरोप

Hollywood Superstar Vin Diesel: गुरुवारी लॉस एंजेलिसमध्ये ग्लोबल स्टारविरोधात त्याची एक्स असिस्टंट आस्टा जॉनसनने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये तिने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Priya More

XXX Actor Vin Diesel :

'फास्ट अँड फ्युरियस' फेम अभिनेता विन डिझेल (Vin Diesel) सध्या अडचणीत आला आहे. विन डिझेलवर त्याची एक्स असिस्टंटने लैंगिंक छळ केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी लॉस एंजेलिसमध्ये ग्लोबल स्टारविरोधात त्याची एक्स असिस्टंट आस्टा जॉनसनने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये तिने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आस्टा जॉनसनने दावा केला आहे की, '२०१० मध्ये अ‍ॅटलांटा येथील 'फास्ट फाइव्ह'च्या सेटवर काम करत असताना अभिनेत्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. डिझेलने तिला आपल्या हॉटेलच्या रूममध्ये बोलावले आणि दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.'

आस्टा जॉनसनने केलेल्या कायदेशीर तक्रारीनुसार, तिला विन डिझेलची सर्व कामं करण्यास सांगितले होते. यामध्ये डिझेलसाठी सर्व व्यवस्था करणे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्याच्यासोबत असणे, तसेच विनसोबतच्या कार्यक्रमांना जाणे आणि त्याचे काम करणे, त्याच्यासोबत प्रवास करणे हे सर्व काम तिला कंपनीने करण्यास सांगितले होते. आस्टा जॉनसनच्या फर्म ग्रीनबर्ग ग्रॉसने एका निवेदनात या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. अभिनेत्यासोबत हे काम करत असताना त्याने अनेक वेळा माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असा देखील दावा आस्टा जॉनसनने केला आहे.

दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सप्टेंबर २०१० मध्ये अभिनेत्याने आस्टा जॉनसनला सेंट रेगिस हॉटेलमधील त्याच्या रूममध्ये येण्यास सांगितले आणि तो क्लबमधून परत येईपर्यंत थांबण्यास सांगितले. डिझेल क्लबमधून परत येताच त्याने पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्याने आस्टा जॉनसनला त्याच्या बेडवर ओढले आणि तिचे कपडे काढायला सुरुवात केली. त्याने आस्टा जॉनसनला अशाप्रकारे पकडले होते की तिला तिथून पळून जाणे शक्य नव्हते.

डिझेलने तिचे कपडे काढायला सुरुवात करताच तिने डोळे मिटले आणि डिझेलच्या भीतीने गप्प बसली. तिला फक्त स्वतःला अभिनेत्यापासून दूर ठेवायचे होते. नोकरीची भीती असूनही जॉनसनने कसा तरी विन डिझेलला ढकलून दिले आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण डिझेलने परत तिला पकडले आणि तिच्यासोबत अश्लिल चाळे करू लागला. त्यानंतर आस्टा जॉनसन जोरजोरात ओरडू लागली.

ही घटना घडली तेव्हा आस्टा जॉनसनला कामावरून काढून टाकले जाईल याची भीती वाटत होती, असे देखील तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे. विन डिझेलने तिच्यासोबत जबरदस्ती लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण तिने विरोध केला. आता याप्रकरणी डिझेलविरोधात नेमकी काय कारवाई केली जाईल हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. पण यामुळे त्याच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने विन डिझेलसोबत काम केले आहे. दीपिकाने 'XXX' या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत काम केले असून याच चित्रपटाच्या माध्यमातून तिने हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटात विन डिझेल मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kareena Kapoor: बिकिनी सीनसाठी करिनाने घटवलं होतं 20 किलो वजन, मगच दिसली स्लिम फिट

Maharashtra Live News Update: शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट! 'मिसिंग लिंक' या दिवशी सुरू होणार, महत्त्वाची अपडेट समोर

Ganesh Chaturthi 2025: तुमच्याही घरी गणपती बसणार आहे? बाप्पाची मूर्ती आणताना 'या' 7 नियमांचं पालन अवश्य करा

भाजप आमदारावर डॉक्टरला मारल्याचा आरोप, क्षुल्लक कारणावरून दादागिरी; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT