kelsi grammer  Saam tv
मनोरंजन बातम्या

kelsi Grammer : प्रसिद्ध अभिनेता वयाच्या ७० व्या वर्षी बनला बाप; बायकोसोबत केलं ८ व्या मुलाचं स्वागत

Kelsi Grammer news : प्रसिद्ध अभिनेता वयाच्या ७० व्या वर्षी बाप बनला आहे. त्याने बायकोसोबत ८ व्या मुलाचं स्वागत केलं.

Vishal Gangurde

अभिनेता केल्सी ग्रामर झाले आठव्या मुलाचे वडील

ग्रामरची पत्नी केट वॉल्श हिने दिला चौथ्या बाळाला जन्म

“पॉड मीट्स वर्ल्ड” पॉडकास्टमध्ये ग्रामर यांनी दिली खुशखबर

केल्सी ग्रामर यांना एकूण आठ मुले

७० वर्षीय हॉलिवूड टीव्ही स्टार केल्सी ग्रामर यांनी चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ग्रामर नुकतेच ८ व्या मुलाचे वडील झाले आहेत. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केल्सी हे ७० वर्षांचे झाले. ग्रामर यांनी 'पॉड मीट्स वर्ल्ड' पॉडकास्टदरम्यान ८ व्या मुलाची खूशखबर दिली. तर पत्नी केट वॉल्श यांनी चौथ्या बाळाचं स्वागत केलं.

पॉडकास्टमील एपिसोडमध्ये केल्सी ग्रामर यांनी म्हटलं की, 'आम्ही चौथ्या मुलाचं स्वागत केलं. आमच्या कुटुंबात एकूण ८ मुलं झालीये. केल्सी ग्रामर हे एमी अवॉर्ड विजेते आहेत. ते टीव्ही इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांच्या ८ व्या मुलाचा जन्म हा एपिसोडच्या तीन दिवस आधी झाला होता.

ग्रामर आणि ४६ वर्षीय केट वॉल्श यांनी २०११ साली लग्न केलं. त्यांच्याजवळ आता दोन किशोरवयीन मुली आणि मुले आहेत. पीपल मासिकेने जूनमध्ये सांगितलं होतं की, ग्रामर जोडपं चौथ्या बाळाचे आई-वडील होणार आहेत. वॉल्श यांच्याआधी ग्रामर यांचं लग्न डान्सर मॉडेल कॅमिल डोनाट यांच्याशी झालं होतं. त्याआधी त्यांनी ली-ऐन चुहानी यांच्या लग्न केलं होतं. तर त्याच्याही आधी त्यांनी डान्स इन्स्ट्रक्टर डोरीन एल्डरमॅन यांच्या लग्न केलं होतं. केल्सी ग्रामर यांना आधी ७ मुले होती.

सिटकॉम स्टार केल्सी ग्रामर हे ऑक्टोबर २०११ साली आजोबा झाले होते. त्यांची मुलगी स्पेन्सर हिने एका मुलाला जन्म दिला होता. त्यांनी २०१८ सालीच साठीनंतर बाप झाल्यानंतरचं आयुष्य कसं असतं, याविषयी भाष्य केलं होतं.

केल्सी ग्रामर यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात त्यांच्या १८ वर्षीय बहिणीच्या हत्येच्या घटनेविषयी माहिती लिहिली होती. या प्रकारानंतर त्यांना आयुष्यभर झगडावं लागल्याचंही त्यांनी पुस्तकात लिहिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: MPSC विद्यार्थ्यांचं क्रांती चौकात आंदोलन!

Lipstick for Skin Tone: तुमच्या स्कीन टोननुसार कशी लिपस्टिक निवडाल?

साला भXX कसा निवडून येतो बघतेच मी, अर्ज माघारीच्या दिवशी भाजपचा राडा; नाशिकमध्ये उमेदवारांमध्ये मारामारी|VIDEO

कोणत्या भाज्यांमध्ये थोडीशी साखर घातल्यास चव वाढते?

Maharashtra Politics: भाजपचा धडाका सुरूच! मतदानाआधीच डोंबिवलीत ७ आणि पनवेलमध्ये ५ उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT