Lisa Marie Presley Instagram @lisampresley
मनोरंजन बातम्या

Lisa Marie Presley: मायकल जॅकसनची एक्स पत्नी लिसा मेरी प्रेस्लीचे निधन

लोकप्रिय अभिनेते एल्विसची यांची मुलगी लिसा मेरी प्रेस्लीचे निधन.

Pooja Dange

Lisa Marie Presley Dies: हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका लिसा मेरी प्रेस्लीचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. घरी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही असे सांगण्यात येत आहे. लिसा या लोकप्रिय अभिनेते एल्विसची यांची मुलगी होती. तिने जगप्रसिद्ध गायक मायकल जॅक्सनसोबत लग्न केले होते.

लिसा मेरी प्रेस्ली ही एल्विस प्रेस्लीची एकुलती एक मुलगी होती. संगीताच्या विश्वात त्यांनी खूप नाव कमावले होते. लिसाच्या मृत्यूने कुटुंबाला धक्का बसला आहे, असे निवेदन कुटुंबीयांनी दिले आहे. या कठीण काळात त्यांच्या गोपनीयतेची काळजी घेतली पाहिजे.

व्हरायटी दिलेल्या वृत्तानुसार, लिसा दोन दिवसांपूर्वी तिची आई प्रिसिला प्रेस्लीसोबत गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. गेल्या गुरुवारी, तिला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ती तिच्या कॅलिफोर्नियातील घरी होती. त्याला सीपीआर देऊन तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

लिसाचा जन्म 1 फेब्रुवारी 1968 रोजी झाला. जन्माच्या केवळ 9 महिने आधी तिच्या पालकांनी लग्न केले. तिच्या पालकांच्या घटस्फोटानंतर ती कॅलिफोर्नियामध्ये तिच्या आईसोबत राहत होती. यादरम्यान ती तिच्या वडिलांनाही भेटत होती. 1977 मध्ये ती 9 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. ती तिच्या आजी-आजोबांसह तिच्या वडिलांच्या मालमत्तेची संयुक्त वारस बनली. 25 व्या वाढदिवशी लिसाला तिच्या आजी-आजोबांच्या निधनानंतर संपूर्ण संपत्ती वारशाने मिळाली, जी 100 दशलक्ष डॉलर असल्याचे म्हटले जाते. 2004 मध्ये, लिसाने तिच्या वडिलांची 85 टक्के मालमत्ता विकली.

जेव्हा लिसा चार वर्षांची होती तेव्हा तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर, तिच्या आईने अभिनेता मायकेल एडवर्ड्सला डेट करण्यास सुरुवात केली. लिसाने खुलासा केला की मायकेल एडवर्ड्सने 12 ते 15 वर्षांच्या वयात तिचे लैंगिक शोषण केले. दारूच्या नशेत तो तिच्या खोलीत जायचा.

लिसाचे लग्न संगीतकार डॅनी केफशी झाले होते. त्यांना दोन मुले होती. लग्नाच्या काही वर्षांनी लिसा आणि डॅनी वेगळे झाले. घटस्फोटाच्या 20 दिवसांनंतरच लिसाने गायक मायकेल जॅक्सनशी लग्न केले. त्यांची पहिली भेट एका कॉन्सर्टमध्ये झाली होती. लिसाने 1996 मध्ये घटस्फोट दाखल केला. यानंतर तिने जॉन ओसजाज्काशी लग्न केले, परंतु हे नातेही जास्त काळ टिकले नाही. तिने तिसरे लग्न निकोलस केजशी केले. दोघांचे लग्न चार महिनेही टिकले नाही. लिसाने मायकेल लॉकवुडशी चौथे लग्न केले. मात्र, लग्नाच्या 10 वर्षानंतर त्यांचाही घटस्फोट झाला.

लिसा मुलगा बेंजामिनच्या मृत्यूचा धक्का सहन करू शकली नाही. तिच्या मुलाने 2020 मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. तिने अनेकदा आपल्या मुलाचा फोटो शेअर करून सोशल मीडियावर भावनिक नोट्स लिहिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT