World Famous Music Director Gary wright Passes Away Instagram
मनोरंजन बातम्या

Gary Wright Passed Away: प्रसिद्ध हॉलिवूड संगीतकाराचं प्रदिर्घ आजाराने निधन, वयाच्या ८० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Gary Wright Dies News: अमेरिकन गायक आणि संगीतकार गॅरी राइट यांचे वयाच्या ८० व्या वर्षी एका गंभीर आजारामुळे निधन झाले आहे.

Chetan Bodke

World Famous Music Director Gary wright Passes Away

हॉलिवूड सिनेृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. अमेरिकन गायक आणि संगीतकार गॅरी राइट यांचे वयाच्या ८० व्या वर्षी गंभीर आजारामुळे निधन झाले आहे. गॅरी राईटचे पार्किन्सन आणि लेवी बॉडी डिमेंशिया आजारासोबत झुंज देत होते. अखेर ही त्यांची झुंज अपयशी ठरली असून त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली आहे.

गॅरी राईट यांच्या निधनाचे वृत्त टीएमझेड या इंग्रजी वेब पोर्टलने दिली आहे. गॅरी राईट यांचे निधन दक्षिण खाडीतील कॅलिफोर्नियामध्ये झाले आहे. बुधवारी अर्थात ६ सप्टेंबर रोजी त्यांचे पार्किन्सन आणि लेवी बॉडी डिमेंशिया या आजारामुळे निधन झाले आहे. या आजारासोबतच्या प्रदीर्घ संघर्षानंतर वयाच्या 80 व्या वर्षी संगीतकाराची प्राणज्योत मालवली.

गॅरी राईट यांचे निधन ६ सप्टेंबर रोजी सकाळी दक्षिण खाडीतील कॅलिफोर्नियातील पालोस व्हर्डेस इस्टेट्स येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान संगीतकाराच्या निधनाचे वृत्त त्याचा मुलगा जस्टिन राईटने टीएमझेड या वेबपोर्टलसोबत बोलताना माहिती दिली.

मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, गॅरी राईट गेल्या काही वर्षांपासून पार्किन्सन्स आणि लेवी बॉडी डिमेन्शिया या आजारासोबत झुंज देत होते. गॅरी यांना रोगाचे निदान झाल्यापासूनच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षभरापासूनच गॅरी राईट पार्किन्सन्स या आजारामुळे जास्तच त्रस्त होता. त्यामुळे गॅरीने या आजारामध्ये हालचाल आणि बोलण्याची क्षमताही गमावली होती.

 टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार, गॅरी राईट यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टर आणि नर्सेसने कुटुंबाला गॅरीकडे आता फक्त काही दिवस शिल्लक असल्याची माहिती दिली होती. संगीतकाराच्या निधनावर त्याचा मित्र आणि गायक गीतकार स्टीफन बिशपने ट्वीटच्या माध्यमातून मित्राला श्रद्धांजली वाहिली. तो म्हणतो, “माझ्या लाडक्या मित्राच्या निधनाची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झालेय. माझा आणि गॅरीने म्युच्युअल म्युझिकल पाल जॉन फोर्ड कोली यांच्यासोबत पहिल्या आणि शेवटच्या वेळी आम्ही एकत्र स्टेज शेअर केला होता. गॅरीचे व्यक्तिमत्व आणि त्याच्या स्वभावामुळे आम्हाला त्याचा स्वभाव लाभला.”

आपल्या पोस्टमध्ये पुढे गायक म्हणतो,  गॅरी आणि त्याची पत्नी रोझने माझ्यावर दाखवलेल्या प्रेमळपणाची आणि दयाळूपणाचा कायमच आदर करतो. गेलेल्या दिवसांबद्दल त्यांनी माझ्याशी शेअर केलेल्या आठवणी माझ्या कायमच आठवणीत आहेत. या दु:खद प्रसंगामध्ये कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसोबत माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT