Robert De Niro Grandson Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Robert De Niro Grandson Dies: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याच्या नातवाचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Robert De Niro Grandson Leandro De Niro: हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते रॉबर्ट डी नीरो यांचा नातू लिएंड्रो डी नीरो याचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

Robert De Niro Grandson Passes Away: हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते रॉबर्ट डी नीरो (Robert De Niro) यांचा नातू लिएंड्रो डी नीरो याचे निधन झाले आहे. त्याने अवघ्या वयाच्या १९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रॉबर्ट डी निरोच्या आकस्मिक जाण्याने त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याची मुलगी आणि लिएंड्रोची आई ड्रेना डी नीरो यांनी सोमवारी एक भावनिक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

रॉबर्ट डी नीरोच्या मुलीने शेअर केलेल्या त्या पोस्टमध्ये लिएंड्रोचा फोटो शेअर करत त्याच्यासोबतच्या काही आठवणी लिहिल्या आहेत. ज्यामध्ये तिच्या वेदना स्पष्टपणे ओसंडून वाहत आहेत. लिएंड्रोच्या आईने शेअर केलेल्या पोस्टमध्ये मृत्यूचे कारण सांगितले नाही.

लिएंड्रोचा फोटो शेअर करत त्याच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की, “माझा प्रिय.. जेव्हापासून मला कळले की तू माझ्या पोटात आला आहेस, तेव्हापासून मी तुझ्यावर किती प्रेम केले आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.” अशी लिएंड्रोच्या आईने भावनिक पोस्ट केली आहे.

रॉबर्ट डी नीरोचा १९ वर्षीय नातू लिएंड्रो डी निरो रॉड्रिग्ज रविवारी दुपारी एका ठिकाणी मृतावस्थेत आढळून आला. न्यूयॉर्क शहरातील अपार्टमेंटमध्ये त्याला भेटायला गेलेल्या एका मित्राला लिएंड्रो मृतावस्थेत आढळला. लिएंड्रोचा मित्रा त्याला बरेच दिवस भेटला नव्हता. त्यामुळे तो त्याला भेटायला गेला, पण तो मृतावस्थेत आढळला. TMZ च्या अहवालानुसार, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी हे उघड केले आहे की, लिएंड्रोच्या शरीराजवळ औषधे आणि ड्रग सामान दोन्ही सापडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT