Baloch Teaser Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Baloch Teaser: 'पानिपत ही मराठयांची शेवटची लढाई नव्हती' मराठ्यांच्या 'बलोच'च्या विजयाची गाथा सांगणारा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Historical Movie Baloch Teaser: मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या 'बलोच' या चित्रपटाचे रोमांचक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.

Pooja Dange

Baloch Teaser Out: मराठ्यांनी अनेक लढाया लढल्या. मराठ्यांनी अगदी अटकेपार झेंडा नेला होता. असं असलं तरी आपल्याला आठवतो तो पानिपतचा पराभव. आपण विसरत चालेल्या मराठ्यांच्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी 'बलोच' हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या 'बलोच' या चित्रपटाचे रोमांचक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये प्रवीण विठ्ठल तरडे आणि अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत.

टीझरची सुरुवात प्रवीण तरडे यांची आवाजाने होते. रक्ताने माखलेली तलवार दिसत असून मागून आवाज येतो, पानिपत ही मराठयांची शेवटची लढाई नव्हती, त्यानंतर वाळवंटात सैनिक धारातीर्थी पडलेले दाखविण्यात आले आहेत. त्यानंतर बलुचिस्तान येथील या लढाईची दृश्य टीझरमध्ये दाखविण्यात आली आहेत. टीझरमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर देखील दिसत आहे. तिच्या पोटात बाळ असूनही ती लढला आहे.

चित्रपटामधील महत्त्वाचे पैलू टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. मराठ्यांची युद्ध्याची तयारी. बलोचला केलेली कूच, तेथील लढाई, रक्तपात आणि मराठ्यांचे शौर्य या सगळ्याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

टीझरमध्ये चित्रपटाची भव्यता दिसत असून अंगावर शहारे आणणारा हा टीझर आहे. प्रवीण तरडे यांचे मनाला भिडणारे संवाद, मराठ्यांचे साम्राज्य टिकवण्यासाठीची तगमग दिसतेय. पानिपतच्या लढाईत पराभव झाल्यानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळणाऱ्या मराठ्यांची व्यथा सांगणारा आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. (Latest Entertainment News)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ''पानिपतचा पराभव हा मराठ्यांच्या दृष्टीने मानहानी करणारा असला तरी मराठ्यांचे सळसळते रक्त त्यांना शांत बसू देत नव्हते. अन्यायाला, अत्याचाराला सोमोरे जात त्यांनी शत्रुला चोख उत्तर दिले. मराठ्यांची हीच विजयगाथा मी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे .''

प्रकाश जनार्दन पवार यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटात दत्ता काळे, जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT