Marathi Movie Chowk Trailer Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Chowk Marathi Movie Trailer Release: आरारा खतरनाक..! 'चौक'चा ट्रेलर वाजणार, सिनेमा महाराष्ट्रात गाजणार.. थरारक ट्रेलर भेटीला

Marathi Movie Chowk: सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला 'चौक'वर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.

Pooja Dange

Pravin Tarde Movie Chowk Trailer Out: ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार...’ या संवादाची चर्चा चौकाचौकात आहे. ‘चौक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चौक’ चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे आहे. चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला चौक, चौकातले उत्सव, चौकातलं राजकारण, चौकातली निखळ मैत्री, चौकात जुळलेलं प्रेम, चौकावर असलेला सोशल मीडियाचा प्रभाव, चौकाने बघितलेल्या पिढ्या आणि याच चौकाने बघितलेले वाद या सगळ्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘चौक’!

या मल्टिस्टारर चित्रपटात अनुभवी कलाकारमंडळी आणि जोडीला नवीन पिढीतील हरहुन्नरी कलाकार यांचा मिलाप बघायला मिळेल. वास्तववादी चित्रण आणि अगदी रोज आपल्या अजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि कानावर पडणारे संवाद ही चित्रपटाची जमेची बाजू आहे, असे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं. यासोबतच संगीतकार साई-पियुष यांचं पार्श्वसंगीत या चित्रपटाला आणखी वास्तववादी बनवत आहे. (Latest Entertainment News)

‘चौक’च्या या झंझावाती ट्रेलरमध्ये प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी यांचे हटके लूक आहेत. भूमिका, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे या नव्या पिढीतील कलाकारांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळत आहे. स्नेहल तरडे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर, सुरेश विश्वकर्मा या कलाकारांचा देखील चित्रपटामध्ये समावेश आहे. बालकलाकार अरित्रा देवेंद्र गायकवाड हिने देखील उत्तम अभिनय केला आहे.

चौकचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटातील कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थित दणक्यात पार पडला. यावेळी चौक चित्रपटातील कलाकारांसोबतच सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री स्मिता गोंदकर व आदी मान्यवरही उपस्थित होते.

कार्यक्रमादम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी देवेंद्र गायकवाड यांचे ‘डिरेक्टर्स क्लब’मध्ये वेलकम करणारा व्हिडिओ सादर करण्यात आला. तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी त्यांचं आणि चौकाचं नातं सांगितलं. हिंदुस्थानी भाऊ, प्रविण तरडे, संजय जाधव, चित्रपटाचे निर्माते दिलीप पाटील यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आले.

‘मराठी चित्रपट हरवला होता, पण पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला उंचीवर आणण्याचं काम या लोकांनी केलं आहे.’ असं मत हिंदुस्थानी भाऊने व्यक्त केलं.

‘चौक’ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे.

या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. चौक १९ मे रोजी राज्यातील प्रत्येक चौकातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Shocking : उल्हासनगर हादरलं! मध्यरात्री ४ जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, परिसरात खळबळ

Monsoon Health Tips: पावसाळ्यात स्कीन इन्फेक्शनचा त्रास? 'या' फॅब्रिकचे कपडे वापरा

Maharashtra Live News Update: राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चितळ हरणे क्वारंटाईन

Malaria Vaccine: मलेरियावरची पहिली भारतीय लस,ICMR करणार खासगी कंपनीशी करार

Soyabean Pakoda Recipe : पावसाळ्यात एकदा 'सोयाबीन भजी' खाऊन तर पाहा, कांदा-बटाट भजी विसरून जाल

SCROLL FOR NEXT