Hina Khan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hina Khan : कॅन्सरशी लढताना पापण्या गळून पडल्या, पण तरीही मानली नाही हार; हिनाला कशी मिळाली प्रेरणा?

Hina Khan Health Update : बॉलिवूड अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. तिने तिचा हेल्थ अपडेट चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

मालिकांमधून सुरुवात करून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारी अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. तिने कायम या कठीण प्रसंगात स्वतःला भक्कम ठेवले आहे. कॅन्सरचा शरीराच्या एक एक अवयावर परिणाम होताना दिसतो. सध्या हिना या वेदनांमधून जात आहे.

कॅन्सर या आजारातून बाहेर येण्यासाठी हिनाची केमोथेरपी चालू आहे. याचा तिच्या शरीरावर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. यामुळे सुरुवातीला तिचे केस गेले आणि आता डोळ्यांच्या पापण्याही गळून पडल्या आहेत. हिना खानने (Hina Khan Health Update) जुलै महिन्यात आपल्याला कॅन्सर झाल्याची बातमी दिली होती.

हिना खानने आपला हेल्थ अपडेट सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना दिला आहे. तिने या पोस्ट मध्ये फक्त एक पापणी उरलेल्या डोळ्यांचा फोटो शेअर केला आहे. चाहत्यांनी या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी धाडसीपणाचं कौतुक केलं आहे तर काहींनी तिला या आजारातून बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. हिना खानचा चाहता वर्ग कायमच या काळात तिच्यासोबत राहीला आहे. हिना खान अनेकांची प्रेरणा आहे.

हिना खानने या पोस्टला कॅप्शनमध्ये एक प्रश्न विचारला आहे. तिने लिहिलं की, माझे प्रेरणेचा स्रोत काय आहे? यावर पुढे हिना लिहिते की, "केमोमध्ये ही शेवटची उरलेली आयलॅश माझी प्रेरणा आहे." तसेच "कोई ना सब ठीक हो जाना" असे म्हणतं ती स्वतःला चार्ज करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT