Kangana Ranaut Saam Digital
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगना रनौतला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Kangana Ranaut Court News: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी कनिष्ठ न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. हा खटला स्थगित करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.

Sandeep Gawade

Bollywood Actress Kangana Ranaut

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी कनिष्ठ न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्याला स्थगिती द्यावी, अशी विनंती करत उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या अभिनेत्री कंगना रनौतला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. कंगनाची मागणी सद्यस्थितीत मान्य करता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी कंगनाची याचिका फेटाळून लावली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने गीतकार जावेद अख्तर यांचा उल्लेख रिपब्लिक चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केला होता. गीतकार जावेद अख्तर यांनी याप्रकरणी कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला. कंगनानेसुद्धा जावेद अख्तर यांच्याविरोधात गुन्हेगारी कट, खंडणी व इतर आरोप करत विरोधी तक्रार दाखल केली. अंधेरी न्यायालयाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचा आरोप रद्द केला व इतर आरोपांप्रकरणी अख्तर यांना २४ जुलै २०२३ मध्ये समन्स बजावले. अख्तर यांनी या समन्सविरोधात दिंडोशी न्यायालयात धाव घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिंडोशी सत्र न्यायालयाने अख्तर यांच्या अर्जावर अंतिम सुनावणी होईपर्यंत रनौतच्या तक्रारीवरून न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली. ही स्थगिती उठल्यानंतर कंगनाविरोधात दाखल केलेल्या खटल्यावर पुन्हा सुनावणी होणार असल्याने कंगनाने उच्च न्यायालयात या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत ॲड. रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी हा निकाल आज जाहीर करत कंगनाच्या अब्रुनुकसानीच्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Flood : गडचिरोलीत पावसाचा कहर! पर्लकोटा नदीला महापूर, भामरागड शहराला पुराचा वेढा; अनेक रस्ते पाण्याखाली

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनाला यंदा विलंब; भरती-ओहोटी आणि भव्य मिरवणुका ठरल्या कारणीभूत

Face Care: उन्हामुळे चेहऱ्याची चमक गेली? 'या' घरच्या पद्धतीने ५ मिनिटांत त्वचा होईल ग्लोइंग

Phlegm : छाती-फुफ्फुसांमध्ये साचलेला कफ मिनिटांत पडेल बाहेर, करा 'हे' ३ आजीच्या बटव्यातील सोपे उपाय

Sukanya Samriddhi Yojana: दरमहा ₹1,500 गुंतवा; मुलीच्या नावावर जमा होईल ₹8.31 लाखांचा फंड

SCROLL FOR NEXT