Akshay Kumar and Sunil Shetty Saam Tv
मनोरंजन बातम्या

'हेरा फेरी 3'मध्ये अक्षय कुमारची होणार एन्ट्री, सुनील शेट्टीने केला खुलासा

अक्षय कुमार आणि परेश रावल 'हेरा फेरी 3' मध्ये पुन्हा एकत्र येऊ शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hera Pheri 3 Update: 'हेरा फेरी 3' या आगामी चित्रपटात अक्षय कुमारच्या जागी र्तिक आर्यनची निवड करण्यात आल्याची बरेच दिवस चर्चा सुरू आहे. अक्षय कुमारचा खास मित्र आणि 'हेरा फेरी' चित्रपटांमधील त्याचा सहकलाकार सुनील शेट्टीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, अचानक झालेल्या या घडामोडीमुळे तो स्वतःही आश्चर्यचकित झाले आहे. मात्र, त्याने अक्षयच्या चाहत्यांना एक आशा दिली आहे. तो म्हणाला की जर सर्व काही ठीक झाले तर अक्षय कुमार आणि परेश रावल 'हेरा फेरी 3' मध्ये पुन्हा एकत्र येऊ शकतात. तसेच अक्षय कुमारची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असेही सुनील शेट्टीने म्हटले आहे.

सध्या 'धारावी बँक' या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये सुनील शेट्टी व्यस्त आहे. दरम्यान सुनील शेट्टीला एका मीडिया इव्हेंटमध्ये विचारण्यात आले की 'हेरा फेरी 3'साठी 'हेरा फेरी'ची मूळ स्टारकास्ट दिसण्याची शक्यता आहे का? त्यावर तो म्हणाला, "जर तसे झाले तर ही सर्वात चांगली गोष्ट असेल. अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यनने घेतली आहे. अक्षय कुमारला रिप्लेस केले जाऊ शकत नाही. कार्तिकपेक्षा एका वेगळ्या भूमिकेसाठी मेकर्स चर्चा करत आहेत. त्यामुळे कोणत्याही वादाला वाव नाही." (Sunil Shetty)

सुनील शेट्टीनेही यावेळी कबूल केले की, अक्षय कुमारशिवाय 'हेरा फेरी'चा अनुभव वेगळा असेल. "ती पोकळी कायमच राहील. काय झाले आहे हे मला बघावे लागेल. याविषयी मला काही माहित नाही कारण मी 'धारावी बँक'मध्ये व्यस्त होतो. या सगळ्यावर काम करण्यासाठी आता माझ्याकडे जास्त वेळ नाहीय," असे सुनील शेट्टी म्हणाला. 19 नोव्हेंबर त्यानंतर मी सर्व काही समजून घेईन, अक्की (अक्षय) आणि इतरांशी यावर बोलेन आणि तेव्हा काय होते का ते पाहू?" (Akshay Kumar)

Hera Pheri

सुनील शेट्टीने 'हेरा फेरी 3'च्या निर्मात्यावरही वक्तव्य केले. तो म्हणाला, "फिरोज नाडियादवाला एक गरीब माणूस आहे. त्याचा 14 वर्षांपासून एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तो माझा जुना मित्र आहे. फिंगर क्रॉस, मी सर्वांना शुभेच्छा देतो." (Bollywood)

'हेरा फेरी' फ्रेंचायझीचा पहिला चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. 'फिर हेरा फेरी' 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. दोन्ही भागात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाने सर्वांचे खूप मनोरंजन केले होते. आता कार्तिक आर्यनसोबत येणार्‍या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात काय वेगळेपण पाहायला मिळणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shinde vs Thackeray: वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी

Maharashtra Live News Update: - सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस खाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

Pune Crime News: पुण्यात दहशत; हातात धारदार कोयते, गलिच्छ शिव्या देत टोळक्यांचा धुडगूस|VIDEO

SCROLL FOR NEXT