Hemangi Kavi Spoke About Menstruation Instagram @hemangiikavi
मनोरंजन बातम्या

Hemangi Kavi Share Post : देवळात जावंसं वाटतं जा, पण... मासिक पाळीविषयीची हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi On Menstruation : हेमांगीने पोस्ट शेअर करताच अनेक नेटकरी हेमांगीला ट्रोल करत आहेत.

Pooja Dange

Hemangi Kavi Facebook Post : अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच तिच्या पोस्टनी लोकांचे लक्ष आणि रोष ओढवून घेते. हेमांगी कवी तिला न पडणाऱ्या, पडणाऱ्या गोष्टी तसेच तिचे अनुभव शेअर करत असते.

हेमांगीने मैत्रेयी बांदेकर या सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्ट रि-शेअर केली आहे.

हेमांगीने ही पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, 'खुप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत? नका जाऊ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका!'

हेमांगीने ही पोस्ट शेअर करताच अनेक नेटकरी यावर कमेंट करून हेमांगीला ट्रोल करत आहेत. एका नेटकाऱ्याने मस्जिदमध्ये जाऊन दाखव ना मग ... उगाच फुस्कारी सोडायची, असे म्हटले आहे.

तर दुसऱ्या नेटकाऱ्याने पोस्ट केली आहे, 'आपल्याला मागे जायचय

थेट अश्म युगांत..! मेंदू बाजुला काढला जातोय सरसकट स्विकारल्या जातायत विचारसरण्या धर्माच्या नावावर.' तर अशा अनेक कमेंट या;या आहेत आणि हेमांगी या सर्वांना सडेतोड उत्तर देत आहे.

हेमांगी कवीने शेअर केलेली पोस्ट

आत्ता थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला, इन्स्टाग्रामवर मैत्रिणीने पाठवलेला... स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये याची 'वैज्ञानिक कारणं' सांगणारा... का तर म्हणे आपल्या शरीरात सात का नऊ वायू असतात.

मासिक पाळी वेळी अशुद्ध रक्त (इथेच आधी हाणलं पाहिजे लोकांना!) खाली ढकलणारा प्रसूती वायू कार्यरत असतो, देवळात वरच्या दिशेने जाणारे वायू असतात आणि ते एकमेकांना अडथळा करतात मग तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो! I म्हणजे, हद होती है यार!

म्हणजे तुम्हाला देवळात नसेल जायचं तर नका जाऊ, कोण हाताला धरून ओढून नेत नाहीत, पण या सगळ्या BS ला किमान वैज्ञानिक तरी म्हणू नका ना! बरं याला जवळपास १ मिलियन लाईक्स!

आणखी अलार्मिंग गोष्ट अशी की यात आपल्या ओळखीत लाइक कोणी केलंय हे तपासलं तर, रिल पाठवणारी सोबत अजून बऱ्याचजणी होत्या, सगळ्या मुलीच! एक आत्ता विज्ञान शाखेतून बारावी पास झालेली विद्यार्थिनी, एक मायक्रोबायोलॉजीमधे मास्टर्स केलेली मैत्रीण, एक बायोटेकच्या फिल्डमध्ये रिसर्च करणारी सीनियर आणि एक तर चक्क डॉक्टर! आता तर बोलणंच खुंटलं ना! अजून किती दिवस आपण आपल्या परंपरागत कुरवाळलेल्या अंधश्रद्धा वैज्ञानिक म्हणून रेटणार आहोत?

बरं माझं असंही म्हणणं नाही की लोकांनी एका अमूक विचारसरणीला फॉलो करावं! तुम्हाला जे फॉलो करावंसं वाटतं ते करा, मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं? जा! नाही जावसं वाटत? नको जाऊ! पण या सगळ्यात विज्ञानाची माती करु नका ना किमान!

तुम्हाला परंपरागत आलेलं जोखडच आता प्रिय आणि योग्य वाटतंय तर हरकत नाही, ते वागवा, मिरवा; जसं नव्वद टक्के लोक करतातच! त्यात विज्ञानाचं validation कशाला हवं? समाजाचं आहे की!

"याच्यामागे कोणतंही लॉजिक नाही पण मी लहानपणीपासून हेच शिकत आले आणि आता इतक्या वर्षांनी मला ही सवय सोडवणार नाही" हे मान्य करुन पुढे जाताच येतं की! त्याकरता प्रत्येक अतर्क्य गोष्टीशी विज्ञानाचा बादरायण संबंध लावायची काहीही गरज नाही आणि त्यातून काही सिद्धही होत नाही!

कधी कधी खूप छान वाटतं की आपल्याला मुलांना बायोलॉजी शिकवायची संधी मिळतेय, त्यांना human reproduction, menstrual cycle च्या मागचं विज्ञान शिकवता येतंय, किमान या ऐकणाऱ्या चाळीसांपैकी दहा जण तरी पुढे आयुष्यभर या गैरसमजुतींपासून फटकून राहतील याचं दरवर्षी मनोमन एक समाधान असतं...

मग कधीतरी हा गैरसमजुतींनी व्यापलेला विशाल समुद्र दूरवर पसरलेला दिसतो! आता फक्त खिन्न वाटतंय... यातून कुणीच वाचणार नाही... विज्ञानही कधीतरी यातच बुडून संपणार आहे! पण मनोमन एक खात्री आहे , स्वतःला दिलेलं वचन आहे, अगदी शेवटापर्यंत, या लोकांनी विज्ञानाला पुन्हा मंत्रतंत्राच्या जाळ्यात लोटून पार नाहीसं करेपर्यंतही म्हणू हवं तर, पण मी मात्र विज्ञानाच्या बाजूनेच राहणार आहे!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT