Hema Malini, Kangana Ranut  and Sunny Leone
Hema Malini, Kangana Ranut and Sunny Leone  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lok Sabha Elections: खासदार हेमा मालिनींचे एका दगडात दोन निशाणे; राखी सावंतसह कंगणा रणौतबद्दल म्हणाल्या…

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या देशात येत्या आगामी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) पडघम वाजू लागले आहेत. देशात लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये आहेत. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी आतापासूनच महाराष्ट्रात दौऱ्यांना सुरुवात केली आहे. गणेशोत्सवात मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) तर सध्या बारामती जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत काटे की टक्कर नक्कीच पाहायला मिळणार आहे.

अशातच बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी (Hema Malini) मथुरा दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान हेमा मालिनींना मथुरा लोकसभेतून भाजपमधून (BJP) कंगनाला तिकिट देणार असा प्रश्न विचारला होता. हेमा मालिनी मथुरेच्या खासदार असल्याने त्या नेहमीच मथुरेचा दौरा करत असतात. दौऱ्या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी कंगनाच्या निवडणूक तिकीटासंबंधीत हेमा मालिनी यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.

यावेळी हेमा मालिनी म्हणाल्या, 'चांगली गोष्ट आहे. माझे विचार देवावर निर्भय आहेत. कोणी चांगला माणूस मथुरेचा खासदार कशाला हवाय. त्या चांगल्या व्यक्तीला नागरिक खासदार होऊनच देणार नाही. तुम्हाला मथुरेत खासदार म्हणुन अभिनेतेच हवे आहेत. मग आम्ही राखी सावंतला पाठवतो. ती ही निवडणूकीत विजय मिळवेल.'

अभिनेत्री कंगणा रणौत गेल्या काही दिवसांमध्ये मथुरेत अनेक वेळा आली होती. याआधी ती कुटुंबाबरोबर वृद्धावनला आली होती. तिने त्यावेळी तिथे बिहारी मंदिराचे दर्शन घेत पुजाही केली. तेव्हा तिने आपली प्रतिक्रिया दिली होती, 'आपले भाग्य आहे की, आपल्याला भगवान कृष्ण आणि राधे मॉं एकत्र पाहण्यचा मिळाला.' त्यानंतर आपला आगामी चित्रपट 'इमरजन्सी' सिनेमाचे शुटींग संपल्यानंतरही भगवान कृष्णाचे दर्शन घेतले. पण तेव्हा मात्र तिने राजकारणाशी निगडीत प्रश्नांची उत्तरं देण्याचे टाळले.

मथुरेत सध्या कंगना निवडणूकीला उतरण्याची चर्चा असली तरी यापूर्वी लोकसभेत भाजपच्या तिकीटावर हेमा मालिनी दोन वेळा निवडणूक जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा २०१९ मध्येही विजय मिळवला होता.

Edit By- Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला अर्ज?

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

SCROLL FOR NEXT