Theresa Cachuela Saam Tv
मनोरंजन बातम्या

Theresa Cachuela: धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलीसमोर सोशल मीडिया इन्फ्लुएंसरवर पतीने झाडल्या गोळ्या

Theresa Cachuela Death Case: थेरेसा कॅचुएला (Theresa Cachuela) असं या 33 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे नाव आहे. थेरेसाच्या पतीनेच तिची हत्या केली. त्यानंतर त्याने देखील आत्महत्या केली.

Priya More

Social Media Influencer Theresa Cachuela:

अमेरिकेच्या (America) हवाई शहरामतून (Hawaii City) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. थेरेसा कॅचुएला (Theresa Cachuela) असं या 33 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे नाव आहे. थेरेसाच्या पतीनेच तिची हत्या केली. त्यानंतर त्याने देखील आत्महत्या केली. ८ वर्षांच्या मुलीसमोरच थेरेसाची हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर थेरेसा तिच्या पतीपासून वेगळी झाली होती. तिचा ४४ वर्षीय पती जेसन कॅचुएलाने तिची हत्या केली आहे. थेरेसाच्या घराच्या कार पार्किंग एरियामध्ये येऊन जेसनने तिच्यावर गोळी झाडली. जी गोळी तिच्या डोक्याला लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी थेरेसा आपल्या ८ वर्षांच्या मुलीसोबत पार्किंग एरियात असताना ही घटना घडली. या घटनेनंतर जेसनने घटनास्थळावरून पळ घातला. त्यानंतर त्याने देखील स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

थेरेसावर तिच्या ८ वर्षांच्या मुलीसमोरच पतीने गोळ्या झाडल्या. या चिमुकल्या मुलीने ही संपूर्ण हृदयद्रावक घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली. तिने पोलिसांना सांगितले की, तिच्या पप्पानेच आईवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: वर गोळ्या झाडून घेतल्या. अमेरिका पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी थेरेसाच्या पतीच्या घरातून ५ शस्त्र जप्त केली आहेत.

थेरेसाच्या हत्येमुळे तिच्या आईला आणि मुलीला मोठा धक्का बसला आहे. थेरेसा आता या जगामध्ये नाही यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये. हवाईमध्ये थेरेसा कॅचुएला 'हाऊस ऑफ ग्लॅम हवाई' म्हणून ओळखले जात होते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. थेरेसाच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या हृदयद्रावक घटनेचा हत्या आणि आत्महत्या या दोन्ही बाजूने पोलिस अधिकारी तपास करत आहेत. थेरेसा यांना तीन मुलं आहेत. पती-पत्नीचा घटस्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT