Priyadarshini Indalkar Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Priyadarshini Indalkar Video: ‘आलिया परिणीतीपेक्षाही तू छान....’ हास्यजत्रा फेम प्रियदर्शनीचं होतंय कौतुक, गाणं ऐकून तुम्हीही पडला प्रेमात...

Priyadarshini Indalkar News: प्रियदर्शनी इंदलकरने ‘शांतीत क्रांती २’च्या शूटिंग दरम्यान एक गाणं गायलं, हा व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Chetan Bodke

Priyadarshini Indalkar Viral Video

लोकप्रिय कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर जितकी तिच्या अभिनयाकरिता चर्चेत असते, तेवढीच ती आपल्या फॅशनमुळे ही चर्चेत असते. कॉमेडी शो, चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्रीने आपल्या लाडक्या चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले. अशातच अभिनेत्रीतील आणखी एक गुण चाहत्यांना दिसला आहे. अभिनेत्रीने शूटिंग दरम्यान एक गाणं गायलंय, या गाण्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

प्रियदर्शनी याआधीही ‘फर्जी’ वेब सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता या वेबसीरीजनंतर प्रियदर्शनी ललित प्रभाकर, अभय महाजन, अलोक राजवडे मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी यांच्यासोबत ‘शांतीत क्रांती २’ या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या वेबसीरिजच्या शूटिंगच्या वेळी तिने एक गाणं गायलं होतं, त्याचा व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

दरम्यान,गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेत्रीने ‘शांतीत क्रांतीच्या शूट दरम्यान एकांतात…’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओमध्ये ‘तनु वेड्स मनु’ मधील ‘युही’ हे गाणं गायलं आहे. अभिनयाप्रमाणेच गाण्यातही माहीर आहे, असं म्हणत अनेकांनी अभिनेत्रीच्या गाण्याचे कौतुक केलं आहे.

अभिनेत्रीच्या व्हिडीओवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, बऱ्याच सेलिब्रिटींनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर एक कमेंट प्रचंड चर्चेत आली आहे, ती कमेंट म्हणजे, ‘शांतीत क्रांतीच्या शूटवेळी, शांतीत केलेली क्रांती...’ अशी कमेंट तिला एका चाहत्याने केली आहे. तर आणखी एक युजर म्हणतो, ‘आलिया परिणीतीपेक्षाही तू छान गाणं गायली आहेस’, तर आणखी एक जण म्हणतो, ‘किती सुंदर प्रियदर्शनी, ऑल राऊंडर आहेस तू’ तर आणखी एक जण म्हणतो, ‘जबरदस्त आवाज आहे गं तुझा...’, अशा विविध प्रतिक्रिया प्रियदर्शनीच्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT