Hardik Pandya gifts a car to son Agastya Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने मुलगा अगस्त्य आणि एक्स पत्नी नताशाला दिली एक खास भेटवस्तू, किंमत वाचून व्हाल थक्क

Hardik Pandya gifts a car to son Agastya: हार्दिक पांड्याने त्याच्या मुलासाठी आणि एक्स पत्नीसाठी असे काही केले आहे ज्याचे खूप कौतुक सोशल मीडियावर होत आहे. त्याने दोघांसाठी एक खास भेटवस्तू दिली आहे.

Shruti Vilas Kadam

Hardik Pandya gifts a car to son Agastya: हार्दिक पंड्याने त्याचा मुलगा अगस्त्य आणि त्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविच यांना एक नवीन डिफेंडर भेट दिली आहे. खासबाब तो नताशाला आधार देतो आणि त्यांची दोघांची काळजी घेतो. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लक्झरी एसयूव्हीची किंमत सुमारे ४ कोटी असल्याचे म्हटले जात आहे. हार्दिक आणि नताशा जुलै २०२४ मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले.

४ कोटी किंमत

हार्दिकने भेट दिलेल्या लँड रोव्हर डिफेंडरची किंमत ४ कोटी आहे. मुंबईस्थित लँड रोव्हर कंपनी नवनीत मोटर्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे. नवनीत मोटर्सनेही नताशा आणि अगस्त्यचा फोटो शेअर केला आहे.

हार्दिक पंड्या त्याची नवीन प्रेयसी माहिका शर्मा

यापूर्वी, हार्दिक त्याची नवीन प्रेयसी माहिका शर्मासोबत छान वेळ घालवताना दिसला. अलिकडच्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान माहिका हार्दिकसोबत कोलंबोलाही गेली होती. दरम्यान, हार्दिकने त्याची नवीन प्रेयसी माहिकाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. महिकाने अलीकडेच १९ फेब्रुवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या २५ व्या वाढदिवशी त्याने तिला २५ भेटवस्तू दिल्या, ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हार्दिक पांड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर ८ सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय संघाने आतापर्यंत टी-२० विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

SCROLL FOR NEXT