Natasa Stankovic  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Natasa Stankovic : नताशा मुंबईत अलेक्झांडरसोबत स्पॉट, कॅमेऱ्याकडे पाहत दिली स्माईल, पाहा VIDEO

Natasha Spotted With Aleksandar Alex : अलिकडेच नताशाचा हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट झाला आहे. मुंबईत आल्यावर पुन्हा एकदा नताशा अलेक्झांडरसोबत स्पॉट झाली.

Shreya Maskar

नताशा (Natasa Stankovic) आणि क्रिकेटर हार्दिक पांड्याचा (hardik pandya) अलिकडेच घटस्फोट झाला आहे. घटस्फोट होण्याआधीपासूनच नताशा अलेक्झांडरसोबत अनेक वेळा स्पॉट झाली आहे. आता पुन्हा एकदा नताशा आणि अलेक्झांडर एकत्र दिसले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला नताशा मुलासोबत ट्रीपवरून मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर एका आठवड्यानंतर नताशा अलेक्झांडरला भेटली. त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. नताशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नताशा बुधवारी संध्याकाळी मुंबईत स्पॉट झाली. तिला जिममधून बाहेर पडताना पापाराझीने स्पॉट केले. नताशा जिम बाहेर मित्र मित्र अलेक्झांडर (Aleksandar Alex) सोबत पाहायला मिळाली. नताशा जिम आउटफिटमध्ये दिसत होती. पांढर जॅकेट, निळ्या टॉप आणि बॉटममध्ये नताशा खूपच सुंदर दिसत होती. अलेक्झांडर ॲलेक्स हा पूर्वी दिशा पटानीचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा होती. व्हिडिओमध्ये नताशा आणि अलेक्झांडर कारमध्ये बसलेले दिसत आहेत. नताशा कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेली पाहायला मिळाली. नताशा गाडी चालवताना हसताना पापाराझीने तिला स्पॉट केले.

जुलै महिन्यात भारतीय क्रिकेटर हार्दिक आणि नताशा स्टॅनकोविक हे विभक्त झाले. नुकतीच नताशाने मुलगा अगस्त्यसोबत सायबेरिया ट्रीप करून मुंबईत परत आली आहे. मात्र नताशा आणि हार्दिकने दोघ मिळून अगस्त्यला सह-पालक बनण्याचा निर्णय घेतला. नताशा आणि हार्दिकच्या घटस्फोटाच्या चर्चा जेव्हा रंगल्या होत्या तेव्हा देखील नताशा आणि अलेक्झांडर स्पॉट झाले होते. त्यामुळे नताशा आणि हार्दिक यांचा घटस्फोटाचे कारण अलेक्झांडर आहे अशा चर्चा देखील झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT