Akshaya Deodhar and Hardik joshi Saam tv
मनोरंजन बातम्या

अखेर साखरपुडा झाला! हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचं नवं चाप्टर सुरु

नरेश शेंडे

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले अभिनेता हार्दिक जोशी (Hardik joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांनी संसार थाटण्यासाठी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केलीय. हार्दिक-अक्षया यांनी टीव्ही मालिकांमध्ये अप्रतिम अभिनय सादर करत मनोरंजनविश्वात ठसा उमटवलाय. अक्षया सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रिय राहून तिचे स्टायलिश फोटो शेअर करत असते. हाद्रिकही त्याच्या चाहत्यांवर प्रचंड प्रेम करतो. अशातच आता या जोडीनं त्यांच्या चाहत्यांना खूषखबर दिली आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी साखरपुडा (Engagement ceremony) केला असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. साखरपुड्याचे फोटो इंन्स्टाग्रामवर शेयर करुन चाहत्यांना त्यांनी एकप्रकारे सुखद धक्काच दिला आहे.

महाराष्ट्राचे लाडके राणा दा आणि अंजली बाईंचा साकरपुढा पार पडला आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतली लाडकी जोडी आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या हार्दिक आणि अक्षयानं साखरपूड्याचे फोटो शेयर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीच्या चर्चाही रंगल्या होत्या. तुझ्यात जीव रंगला मालिका आता प्रेक्षकांचं मनोरंजन करत नसली, तरी दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहून चाहत्यांची मनं जिंकतात. दोघांमध्ये नवं नात सुरु झाल्याच्या चर्चा होत्या पण त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टपणे कधी सांगितलं नव्हतं. पण आता इंन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेयर करुन दोघांनीही संसाराच्या नव्या पर्वाला सुरुवात केली असल्याचं जाहीर केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT