Sayali Sanjiv And Ruturaj Gaikwad Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sayali Sanjiv: सुबोध भावेने सायलीची केली पोलखोल; खऱ्या प्रेमाचा केला खुलासा

यावेळी सायलीने सीएसकेचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबत अफेअर असल्याच्या चर्चा धुडकावून लावल्या. तो 'काहे दिया परदेस' मालिकेचा फॅन होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bas Bai Bass On Sayali Sanjiv: सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सायली संजीवकडे पाहिले जाते. तिच्या अभिनयाचा ठसा हा प्रेक्षकांच्या मनावर चांगलाच पडलेला आहे. तसेच तिचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आपल्याला दिसतो.

'झी मराठी' वरील लोकप्रिय रिअॅलिटी शो असलेला 'बस बाई बस' या कार्यक्रमात सुत्रसंचालकाच्या भूमिकेत असलेला सुबोध भावे त्याच्या कार्यक्रमात आपल्या क्षेत्रात माहिर असलेल्या महिलांना तो कार्यक्रमात बोलवतो. या कार्यक्रमात राजकारणातील महिलांनीही आपली उपस्थिती लावली होती. तसेच त्याने या आठवड्यात झी स्टुडिओज प्रस्तूत 'हर हर महादेव' चित्रपटात महाराणी सईबाईंचे पात्र साकारणाऱ्या सायली संजीवला आमंत्रित केले होते.

सुबोध आपल्या खुमासदार पद्धतीने त्या महिलांना प्रश्न विचारत बोलतं करतो. त्याची ही पद्धत बऱ्याच जणींना अडचणीत आणते. सोबतच या आठवड्यात सायलीने हजेरी लावली होती. सायलीने या कार्यक्रमात आपल्या कॉलेजमधल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.

सध्या सायली संजीवचे स्पेशल एपिसोड मधील प्रोमो सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. या कार्यक्रमात एका सेगमेंटमध्ये सायलीला प्रपोज करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने कॉलेजमधील एक गमतीशीर किस्सा सांगितला.

यावेळी तिने चेन्नई सुपरकिंग्जचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबत (Ruturaj Gaikwad) अफेअर असल्याच्या चर्चा धुडकावून लावल्या. तो 'काहे दिया परदेस' मालिकेचा फॅन होता. मलाही आश्चर्य वाटलं होतं, पण माझ्यापेक्षा तो खूपच लहान आहे, असं म्हणत सायलीने पुन्हा एकदा या अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

मालिकेतील को-स्टारसोबत कधी सूत जुळलं का, असा प्रश्न विचारला असता काहे दिया परदेसमधील ऋषी सक्सेनासोबत जुळवायचे. हे सर्व किस्से आपल्याला माहित असतील. यावेळी शरद केळकरने 'बिना आग के धुआ नही निकलता' असे बोलत चिमटा काढला.

'ऋतुराज गायकवाडच्या बाबतीतही झालं होतं' असं म्हणत कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेते सुबोध भावेनेही यात उडी घेतली. 'तुम्ही हा प्रश्न मला विचारताय?' असं सायली आश्चर्याने म्हणातच 'लोकांच्या मनातला प्रश्न आहे' असं भावे म्हणाले. त्यावर 'असेल तर मला प्लीज बॅट पाहिजे' अशीही शरदने सायलीची खिल्ली उडवली.

'बॅट मी मिळवून देऊ शकते कारण तो माझा खरंच खूप चांगला मित्र आहे. आयपीएल खेळणारे दोन-तीन जण माझे मित्र आहेत. एक आरसीबीमध्ये आहे, ऋतुराज आणि तुषार देशपांडे सीएसकेमध्ये आहे. हे सगळे काहे दिया परदेसचे फॅन होते. मला आश्चर्य वाटलं की क्रिकेटर कसे काय सिरीअलचे चाहते? म्हणजे त्यांना कधी वेळ मिळतो मालिका बघायला. पण माझ्यापेक्षा खूप लहान आहेत ते' असं म्हणत सायलीने या चर्चांना पूर्णविराम दिला.

दरम्यान, सुबोध भावेंनी सायलीच्या कॉलेज जीवनात अनेक मुलांना प्रपोज करायची असं सांगून अनेक गुपितांची पोल खोल केली. त्यानंतर एकामागून एक किस्से बाहेर येत असताना, विजांची भीती वाटते म्हणून मुलांना प्रपोज करायचीस का? कपाट आवरण्याचा कंटाळा येतो म्हणून करायचीस का? अशे अनेक प्रश्नांनी तिच्यावर टिकास्त्र सोडले.

त्यावर सायलीनेही 'त्यातला एक होता, खूप नीटनेटका होता, बॅगही उत्तम भरायचा, कपाटही रोज आवरायचा की काय, कारण मला आज कपाट आवरायचाय असं म्हणून तो एकदा अचानक निघून गेलेला' असं साळसूदपणे सांगितलं. त्यावर 'तिथेच तो नजरेत भरला का?' असा सवाल सुबोध भावेंनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT