HBD Suhana Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

HBD Suhana Khan: शाहरुखची लेक सुहाना झाली २४ वर्षांची; कोट्यवधी रुपयांची आहे मालकीण, जाणून घ्या

Suhana Khan Net Worth: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लेक सुहाना खान (Shahrukh Khan Daughter) नेहमी चर्चेत असते. सुहाना खान आज आपला २४ वा वाढदिवस साजरा करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लेक सुहाना खान (Shahrukh Khan Daughter) नेहमी चर्चेत असते. सुहाना खान आज आपला २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुहाना खानने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. सुहाना खानने 'द आर्चीज' या चित्रपटातून डेब्यू केला आहे. चित्रपटातील सुहानाच्या अभिनयाचे सर्वांनी खूप कौतुक केले होते. सुहानाने लहान वयात खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केले आहे. सुहाना खान ही २४ व्या वर्षीच कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. जाणून घेऊया सुहाना खानची संपत्ती किती आहे.

सुहाना खान (Suhana Khan)ही बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लेक आहे. शाहरुख खानला आर्यन, सुहाना आणि अब्राहम अशी तीन मुले आहे. एकुलती एक मुलगी असल्याचे सुहाना शाहरुख आणि गौरीची लाडकी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुहाना खानचे न्यू यॉर्कमध्ये स्वतः चे अलिशान घर आहे. या घराची किंमत सुमारे ३५ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सुहानाने अलिबागमध्येही एक जागा खरेदी केली होती. या जागेची किंमत जवळपास १० कोटी असल्याचे बोलले जात आहे.

सुहाना खान ही एका ब्युटी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ती maybelline या ब्यूटी ब्रँडचा चेहरा आहे. या ब्रँडच्या जाहीरातींमधून ती कोट्यवधी रुपये कमावते. मीडिया रिपोर्टनुसार, सुहाना खानची एकूण संपत्ती १३ कोटी रुपये आहे. अलिशान घर, जागेशिवाय तिच्याकडे रेंज रोव्हर आणि लम्बोर्गिनी सारख्या महागड्या कार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

SCROLL FOR NEXT