बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने ९०च्या दशकापासून आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. गाण्यापासून अभिनयापर्यंत सर्वच क्षेत्रात सोनूने आपला ठसा उमटवला आहे. १९७३ मध्ये फरीदाबादमध्ये जन्मलेल्या सोनू निगमचा आज (३० जुलै) ५१ वा वाढदिवस आहे. त्याने आपल्या जादुई आवाजाने प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान मिळवलं आहे.
मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे आयुष्यात यश मिळवण्यासाठी त्याने कठोर संघर्ष केला. आज आपण सोनू निगमच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या करियरबद्दल जाणून घेऊया...
एकेकाळी लग्नसोहळ्यात किंवा 'माता की चौकी'मध्ये गाणाऱ्या सोनू निगमने बॉलिवूडमध्ये स्वत:चे नशीब आजमावले आहे. सोनूला त्याच्या वडिलांकडून गाण्याचा वारसा मिळाला आहे. त्याचे वडील आगम निगम यांनी सोनूला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांच्यासोबत गाणं गायला घेऊन जायचे. सोनूने आपल्या वडिलांसोबत स्टेज शो, पार्ट्या आणि फंक्शन्समध्ये गाणे गायला सुरुवात केली. सोनू निगमने सुरुवातीपासूनच ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांचे आदर्श घेऊन गायन क्षेत्रात आपले करियर केले.
अवघ्या चार वर्षांचे असताना त्यांनी पहिल्यांदा स्टेजवर 'क्या हुआ तेरा वादा' हे गाणे गाऊन लोकांची मने जिंकली. यानंतर त्यांनी वडिलांसोबत स्टेजवर अनेकदा गाणी गायली. वडिलांकडूनच गायनाचे बाळकडू मिळत असल्याने सोनू निगमने गायन क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. सोनूने गायनात करियर करायचे ठरवल्यानंतर त्याने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. सोनू १८-१९ वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला मुंबईला घेऊन आले होते. मुंबईत आल्यानंतर सोनू निगमने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले.
सोनू निगमला प्रथम टी-सीरीजने ब्रेक दिला आणि 'रफी की यादें' नावाचा त्याच्या गाण्यांचा अल्बम रिलीज केला. 'जानम (१९९०)' या चित्रपटात सोनू निगमने पहिले गाणे गायले, पण हा चित्रपट काही कारणास्तव रिलीज झाला नाही. यानंतर त्याने दूरदर्शनच्या 'तलाश' शोसाठी 'हम तो छैला बन गए' हे गाणं रेकॉर्ड केले. त्यानंतर त्यांचे पहिले चित्रपटातील गाणे 'ओ आसमान वाले' रिलीज झाले आणि त्यांनी 'आज मेरी जान'ला आवाज दिला. पण त्याला विशेष ओळख मिळाली नाही.
१९९२ मध्ये आलेला त्यांचा 'रफी की यादें' हा अल्बम खूप प्रसिद्ध झाला, पण 'बेवफा सनम (१९९५)'मधील 'अच्छा सिला दिया' या सुपरहिट गाण्याने त्यांना नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली, ज्याने त्याचे नशीब बदलले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.