Happy Birthday Alia Bhatt Instagram
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt: अभिनेत्री म्हणून नाही तर आलिया एक यशस्वी बिझनेसवूमन... ‘या’ माध्यमातून घरबसल्या कमावते करोडो रुपये

आलिया भट्टने आपल्या सिनेकारकिर्दीत बॉलिवूडमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आलिया अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध तर आहे, पण एक बिझनेस वुमन म्हणूनही प्रसिद्ध आहे.

Chetan Bodke

Happy Birthday Alia Bhatt: आलिया भट्टने आपल्या सिनेकारकिर्दीत बॉलिवूडमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आलिया अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध तर आहे, पण एक बिझनेस वुमन म्हणूनही प्रसिद्ध आहे. आलिया एक बॉलिवूड अभिनेत्री, मुलगी, सून, पत्नी, आई तसेच बिझनेस वुमन आहे. आलियाने नेहमीच 'हम भी किसी से कम नहीं' असे म्हणत स्वत:चे स्थान सिद्ध केले आहे.

आलिया भट्टचा 15 मार्च रोजी अर्थात आज वाढदिवस आहे. आलिया सुरुवातीपासूनच करिअर ओरिएंटेड आहे. ती केवळ एक प्रख्यात अभिनेत्री नाही तर एक बिझनेसवुमन म्हणूनही खूप चर्चेत आहे. आलियाने नुकताच स्वतःचा उपक्रम सुरू केला आहे. अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणात तिचे फॅशन लेबल एड-ए-मम्मा पुन्हा लाँच केले. आलियाने हा व्यवसाय ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू केला होता. हा किड्स वेअर ब्रँड असून त्यामध्ये तिने मॅटर्निटी आउटफिट्स देखील समाविष्ट केले आहेत.

आलियाच्या बिझनेसची सर्वत्र चर्चा होत असते. कारण आलियाने हे फॅशन लेबल केवळ 1600 आउटफिटसह सुरू केले आणि आता त्याची संख्या एक कोटीपर्यंत पोहोचली आहे. आलियाने याआधी केवळ एका ऑनलाइन पोर्टलने आपल्या बिझनेसची सुरुवात केली होती, परंतु आतापासून तिच्या कपड्यांचे ब्रँड अनेक स्टोअरमध्ये आणि पोर्टलवर उपलब्ध आहे. हा ब्रँड ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.

ॲड-ए-मम्मा व्यतिरिक्त, आलिया इतर अनेक प्रोजेक्टमध्ये तिने गुंतवणूक केली आहे. आलियाने Phool.co कंपनीतही आपले शेअर्स गुंतवले आहेत. ही कंपनी पाण्यात फेकल्या जाणाऱ्या टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करते. याशिवाय, अभिनेत्रीने सौंदर्य आणि फॅशन प्लॅटफॉर्म Nykaa आणि वैयक्तिक स्टाइलिंग प्लॅटफॉर्म StyleCracker मध्येही गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना आलिया म्हणाली होती की, जेव्हा मी स्वतःला त्या संस्थेच्या व्हिजनशी जोडताना पाहते तेव्हा मी पैसे गुंतवते.

आलियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, "जेव्हा ती लहान होती तेव्हा ती महेश भट्टच्या पायावर क्रीम कशी लावायची, जेणेकरून पापा खूश होतील आणि तिला ५०० रुपये देतील." यावर महेश भट्ट म्हणतात, "आलिया लहान होती तेव्हा ती माझ्या पायावर 500 रुपयांची क्रीम लावायची आणि माझ्याकडून पैसे मागायची. पण आज तिने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने एवढा पैसा कमावला आहे, जो मी माझ्या आयुष्यात गेल्या ५० वर्षात कमावला नाही."

दहा वर्षांच्या कारकिर्दीत आलिया भट्ट करोडोंच्या संपत्तीची मालक बनली आहे. तिची एकूण संपत्ती २९९ कोटी रुपयांची आहे. फोर्ब्सच्या सेलिब्रिटींच्या यादीनुसार, आलियाने २०१७ मध्ये सुमारे ३९.८८ कोटी, २०१८ मध्ये ५८.८३ कोटी आणि २०१९ मध्ये ५९.२१ कोटी कमावले.

थोडक्यात सांगायचे तर आलियाचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ६० कोटी इतके आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया एका चित्रपटासाठी 20 कोटी रुपये इतके मानधन आकारते. मात्र, आलिया आपल्या भूमिकेप्रमाणेच मानधन आकारते.

आलियाला महागड्या वाहनांचीही खूप आवड आहे. अभिनेत्रीकडे १.७० कोटी किमतीची BMW 7 Seriesची कार, ७० लाख किमतीची Audi A6, ९० लाख किमतीची Audi Q7 आणि Range Rover Vogue आहे, ज्याची किंमत भारतात अंदाजे 3 कोटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT