Hema Malini: हेमा मालिनी साकारणार 'गंगा'ची भूमिका; अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खास नृत्यनाटिकेद्वारे

'गंगा' ही नृत्यनाटिका घेऊन अभिनेत्री हेमा मालिनी आपल्या भेटीला येत आहे.
Hema Malini Will Perform Ganga
Hema Malini Will Perform GangaSaam TV

Hema Malini Dance: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजे ७५ व्या वर्षात 'आजादी का अमृत महोत्सव ' म्हणून आपल्या मातृभूमीचा गौरव साजरा करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका हेमा मालिनी १९ मार्च २०२३ ला संध्याकाळी ६. ३० वाजता 'गंगा' ही नृत्यनाटिका जमशेद भाभा थिएटर,एन सी पी ए येथे सादर करणार आहेत.

अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र सरकारने सर्व राज्यांतील ७५ नद्या स्वच्छ तसेच पुनरुज्जीवित करण्याची मोठ्या योजना हाती घेतली आहे. या नृत्यनाटिकेतून गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर झालेले अवतरण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . तसेच विविध सहस्त्रकातून विविध प्रदेशातून गंगा नदीचा झालेला आकर्षक प्रवास देखील प्रेक्षकांना या नृत्यनाटिकेतून दाखविण्यात येणार आहे.

गंगा नदीने युगानुयुगे पाहिलेल्या विविध युगांची झलक यातून पाहायला मिळणार असून आजच्या कलियुगात ही पवित्र नदी दुर्लक्षित आणि उद्ध्वस्त अवस्थेत असल्याने ती व्यथित होण्यापर्यंतचा प्रवास यात मांडला आहे . पण गंगा माता ही जीवनदायिनी आहे. आजच्या पिढीकडून तिच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तिची शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी एक खरी आई म्हणून ती आपल्याला विनंती करत आहे.

Hema Malini Will Perform Ganga
Kanjoos Makkhichoos Trailer: कुणाल खेमूच्या 'कंजूस मक्खीचूस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटगृहात नाहीतर 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

हिंदू धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या सर्व गोष्टींचे गंगा नदी हे प्रतीक आहे . हजारो वर्षांच्या कठोर तपश्चर्येने राजा भगीरथाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली. गोमुख येथील हिमनदीच्या उगमापासून ते बंगालच्या उपसागरात प्रवाहित होणाऱ्या, भारतीय मैदानावरील लांब पल्ल्यापर्यंत गंगेने वाळूचा प्रत्येक कण पवित्र केला आहे. संपूर्ण प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांचे पोषण केले आहे. गंगा नदीच्या काठाने महान ऋषींना आणि कवींना जीवनातील रहस्यांचा खोलवर शोध घेण्याची प्रेरणा मिळाली आहे.

हेमा मालिनी यांनी प्रतुक्रिया देत म्हटले आहे की," आजच्या तरुण पिढीला नद्यांशी जोडणे आणि नद्यांची काळजी घेण्यास प्रवृत्त करणे, असे उदात्त ध्येय असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या या उदात्त उपक्रमात सहभागी होताना मला अभिमान वाटतो. ‘चलीये, जानिये नदी को.’

या अभियानातील माझे योगदान म्हणजे 'गंगा' हे संशोधन केलेले आणि कौशल्यपूर्ण नृत्य सादरीकरण सादर करणे. हे नृत्यनाट्य आम्हा सर्वांना आमच्या नद्यांची काळजी घेण्यासाठी आणि एकत्रित मानवी प्रयत्नांद्वारे त्यांना पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे.' हेमा मालिनी आपल्याला गंगा मातेच्या आकर्षक प्रवासात सहभागी होण्यास सांगत आहेत.

या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि निर्मात्या हेमा मालिनी असून संगीत पद्मश्री रवींद्र जैन, आशित देसाई आणि आलाप देसाई यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन भूषण लकांद्री वेशभूषा नीता लुल्ला,सल्लागार देवदत्त पट्टनायक संशोधन राम गोविंद,संवाद आणि गीत पद्मश्री रवींद्र जैन आणि शेखर अस्तित्व पार्श्वगायक सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, मिका सिंग आणि रेखा राव यांचे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com