Kanjoos Makkhichoos Trailer: कुणाल खेमूच्या 'कंजूस मक्खीचूस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटगृहात नाहीतर 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

'कंजूस मक्खीचूस' चित्रपटाच्या ट्रेलरमुळे कुणाल खेमू चर्चेत आहेत.
Kanjoos Makkhichoos Trailer Out
Kanjoos Makkhichoos Trailer OutInstagram @kunalkemmu

Kanjoos Makkhichoos Trailer Out: बॉलिवूड अभिनेत्री कुणाल खेमू बऱ्याच दिवसांनी आपल्याला चित्रपटामध्ये दिसणार आहे. कुणालचा 'कंजूस मक्खीचूस' हा चित्रपट लवकरच आपल्या भेटला येणार आहे. नुकताच या चित्रपटच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'कंजूस मक्खीचूस' चित्रपटाच्या ट्रेलरमुळे कुणाल खेमू चर्चेत आहेत. या चित्रपटामध्ये कुणाल एका कंजूस व्यक्तीचे पात्र साकारत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे.

Kanjoos Makkhichoos Trailer Out
Urfi Javed: उर्फीची फॅशनच तिच्यावर उलटली, उर्फी जोमात नेटकरी कोमात

कंजूस मक्खीचूस या चित्रपटात कुणाल खेमूसह श्वेता त्रिपाठी,पीयूष मिश्रा, अलका अमीन आणि दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर कुणाल खेमूने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर खूपच दमदार आहेत. ट्रेलरवरून चित्रपट किती भन्नाट असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. या ट्रेलरमध्ये तुम्हाला कॉमेडी, ड्रामा, डान्स, इमोशन असं सर्व काही पाहायला मिळत आहे.

कुणालने ट्रेलरला एक कॅप्शन देखील दिले आहे. ऑफिशिअल ट्रेलर| हा आहे खूप कंजूस पण कुटुंबावरचे प्रेम दाखवण्यात कधीच कंजूषपणा करत नाही! #KanjoosMakhichoos मधील कथा जमनाप्रसाद पांडे यांची आहे, २४ मार्च रोजी फक्त #ZEE5 वर प्रदर्शित होत आहे', असे कुणालने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

कुणाल खेमू आणि शश्वेता त्रिपाठी यांचा कंजूस मक्खीचूस हा चित्रपट 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. २४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कुणाल या चित्रपटासाठी नेटकरी उत्सुक आहेत. तसेच त्यांना या चित्रपटाकडून आणि कुणालकडून खूप अपेक्षा आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com