Urfi Javed share new look
Urfi Javed share new lookSaam Tv

Urfi Javed Looks: उर्फीची फॅशनच तिच्यावर उलटली, उर्फी जोमात नेटकरी कोमात

उर्फी पुन्हा एकदा एक नवीन गेटअपमध्ये सर्वांसमोर आली होती.

Urfi Javed New Look: उर्फी जावेद हे असे व्यक्तिमत्व आहे ज्याला आता ओळखीची गरज नाही. टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी उर्फी 'बिग बॉस'मुळे चर्चेत आली. त्यानंतर उर्फी जी चर्तेत आली ती कायमचीच. उर्फी कधी नेटकऱ्यांचे निशाण्यावर येते तर राजकारण्यांचा. पण कोणाला कसे उत्तर द्यायचे तिला बरोबर माहीत आहे.

उर्फी नेहमीच तिच्या स्टाईलमुळे बातम्यांमध्ये येत असते. पुन्हा एकदा उर्फीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उर्फीने यावेळी तिच्याच डोक्याला ताप केला आहे. तिच्या तापाचे तिला काय परिमाण भोगावे लागत आहेत हे बघूया.

Urfi Javed share new look
Viral Video: सलमानला 'या' अभिनेत्रीसोबत करायचे लग्न, अभिनेत्रीने नाही तर तिच्या वडिलांनीच दिला नकार...

उर्फी पुन्हा एकदा एक नवीन गेटअपमध्ये सर्वांसमोर आली होती. फॅशनिस्टा उर्फीने तिच्या छातीवर सॅटिनचा पट्टी सारखा टॉप घातला होता. तर सॅटिनची पांढरी पँट घातली होती. यावेळी खरी चर्चा होती ती उर्फीच्या डोक्याची. उर्फीने डोक्यापासून पायापर्यंत लोळणाऱ्या निळ्या मण्यांच्या माळा केसांमध्ये लावल्या होत्या.

उर्फीला तिच्या या माळांमुळे चालताना अडथळे निर्माण होत होते. ती पापाराझींसमोर देखील खूप काळजीपूर्वक कॅमेऱ्यांसमोर पोज देत होती. कारण तिने केल्या या उपद्वपामुळे तिला मान फिरवणे देखील कठीण झाले होते. तिच्या या स्टाईलवर अनेकजण कमेंट हसत आहेत आणि मजा घेत आहेत.

उर्फीने नुकताच टोपलीच्या बांबूपासून बनलेल्या ड्रेस घालून व्हिडिओ शेअर केला होय. हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने लिहिले होते की, “बांबूच्या टोपलीपासून हे बनवले आहे, ही आता मरत चाललेली कला आहे असे मला वाटते. हे कारागीर बांबूच्या वापर करून अशी अप्रतिम भांडी, खुर्च्या, टेबल कसे बनवतात हे पाहून मला नेहमीच आश्चर्य वाटायचे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com