Sukesh Chandrasekhar : जॅकलिन, नोराच्या अडचणी वाढवणाऱ्या सुकेशची हेराफेरी रुपेरी पडद्यावर ?; 'हे' कलाकार असणार मुख्य भुमिकेत

मनीलाँड्रिंग प्रकरणात चर्चेत असणाऱ्या सुकेशवर लवकरच चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Sukesh Chandrasekhar Movie
Sukesh Chandrasekhar MovieSaam Tv

Sukesh Chandrasekhar Movie: सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याच्या सोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही देखील कमालीच्या चर्चेत आहेत. मनीलाँड्रिंग प्रकरणात चर्चेत असणाऱ्या सुकेशवर लवकरच चित्रपट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आनंद कुमार या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

Sukesh Chandrasekhar Movie
Kanjoos Makkhichoos Trailer: कुणाल खेमूच्या 'कंजूस मक्खीचूस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटगृहात नाहीतर 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

सुकेश सध्या दिल्लीतील मंडोळी कारागृहात आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यावरील सिनेमाचं कथानक लिहिण्यासाठी आनंद कुमार थेट मंडोळी कारागृहात पोहोचले आहेत. मंडोळी कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली असून त्याच्या सोबत बसून ते चित्रपटाचे कथानक लिहिणार आहेत. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली सध्या तो तुरुंगात असून त्याच्यावर अनेक आरोप आहेत.

चित्रपट निर्माते आनंद कुमार यांच्या चित्रपटात सुकेशच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आणि फसवणुकीची संपूर्ण कथा यामध्ये दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या या चित्रपटात कोणते कलाकार काम करणार अद्याप हे अस्पष्ट आहे. सुकेश 200 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. त्याचबरोबर या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचीही प्रामुख्याने नावे आहेत.

Sukesh Chandrasekhar Movie
‘Ghar Bandook Biryaani’ तील मोस्ट वॉन्टेड गुंडांची नावे आले समोर, साकारणार ‘हे’ कलाकार गुंडांची पात्र

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी सुकेशवर झालेल्या आरोपांमध्येही हातभार लावला होता. अशा परिस्थितीत जॅकलीन आणि नोरा फतेही यांची भूमिकाही चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चंद्रशेखरवर राजकारणी, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींकडून पैसे उकळल्याचा आणि फार्मा कंपनी रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांना 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.